आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे – निवडणूक निर्णय अधिकारी कदम

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

        *  मुखेड – कंधार विधानसभेसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

        *  2 लाख 82 हजार 154 मतदार मतदानाचा हक्क बजावणार

        *   खुल्या प्रवर्गातील 10 हजार तर एस.सी., एस.टी.च्या उमेदवारासाठी 5 हजार रुपये                       अनामत

 ज्ञानेश्वर डोईजड
             मुखेड:  मुखेड – कंधार (91) विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम चालु झाले असुन या काळात सर्वांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे . आचारसंहिता भंग केल्यास कडक कार्यवाही करण्यात येईल असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शक्ती कदम यांनी दि. 22 रोजी सायंकाळी 6 वाजता मुखेड तहसिल कार्यालयाच्या नवीन इमारतीत निवडणुकीच्या पुर्वतयारी अनुषंगाने घेण्यात आलेल्या  पत्रकार परिषदेत माहिती दिली.
  दि. 27 सप्टेंबर 2019 ते 04 ऑक्टोबर 2019 पर्यंत नामनिर्देशन, दि. 05 रोजी छाननी, दि. 07 ऑक्टोबर 2019 रोजी अर्ज मागे घेण्याची तारीख, दि. 21 ऑक्टोबर रोजी मतदान तर दि. 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.यामध्ये 1 लाख 34 हजार 170 स्त्री मतदार व 1 लाख 47 हजार 977 पुरुष मतदार व इतर 7 असे एकुण 2 लाख 82 हजार 154 मतदार मतदानाचा हक्क मुखेड – कंधार मतदार संघात बजावणार आहेत. मतदार संघात 341 मतदान केंद्रे असुन त्यात मुखेड तालुक्यात 264 तर कंधार तालुक्यातील 77 मतदान केंद्रे आहेत.
मतदार संघात निवडणूक निर्णय अधिकारी कदम,सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणुन मुखेडचे तहसिलदार काशिनाथ पाटील, मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे व देगलुर येथील मुख्याधिकारी जी.एल. इरलोड यांच्या नियुक्त्या निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शक्ती कदम यांनी केल्या आहेत. त्यात देगलुर येथील नायब तहसिलदार यांच्याकडे नामनिर्देशन व चिन्ह वाटप, पी डी गंगनर यांच्याकडे कर्मचारी नियुक्ती व ट्रेनिंग, एस.एस.मामीलवाड यांच्याकडे ई.व्हि.एम. व व्हिव्हि पॅट मशीन, आर.आर. पदमवार यांच्याकडे साहित्य देखरेख, मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांच्याकडे मतदार यादी तयार करणे व आचारसंहिता भंग शहर प्रमुख तर ग्रामीण भागात गटविकास अधिकारी के. व्हि बळवंत यांच्याकडे देगलुर येथील मुख्याधिकारी जी.एल. इरलोड यांच्याकडे पोस्टल मतदान व तहसिलदार काशिनाथ पाटील यांच्याकडे झोन (मार्ग) तयार करणे अशा समित्या तयार करण्यात आलेल्या आहेत.
            मतदार संघात एस.एस.टी. 3 पथक तयार करण्यात आले असुन त्यामध्ये सलगरा , जांब बु, रावणकोळा,आचार संहिता चौकशी पथक चार असुन त्यात मुखेड शहर – 2 , बा­हाळी व इतर ठिकाणी असे पथक नेमण्यात आलेले आहेत. तर या निवडणूकी करीता 32 झोन निश्चीत करुन 32 क्षेत्रीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली असुन मतदारांना आमीष दाखवुन बेकायदेशीर रक्कम वाटप करणे, मद्य वस्तु तसेच किंमती वस्तु भेट देणे इत्यादी बाबीवर लक्ष ठेवण्याकरीता भरारी पथकाचे 8 तासाकरीता 1 याप्रमाणे 12 पथके कार्यान्वीत करण्यात आली आहेत.
या निवडणूकीत उमेदवाराचे फॉर्म ऑफलाईन घेण्यात येणार असुन खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी 10 हजार रुपये व एस.सी., एस.टी. प्रवर्गातील उमेदवारासाठी 5 हजार रुपये अनामत रक्कम तर मतदान केंद्रावर राखीव कर्मचा­ऱ्यासह 1 हजार 500 कर्मचा­ऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती  निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शक्ती कदम यांनी दिली.

            या पत्रकार परिषदेस निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शक्ती कदम, तहसिलदार काशिनाथ पाटील, मुखेड नपाचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे, देगलुरचे मुख्याधिकारी जी.एल. इरलोड आदी उपस्थित होते. तर या कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने मुखेड पोलिस निरीक्षक नरसिंग आकुसकर, मुक्रमाबाद येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक के.एन. गड्डीमे, माळाकोळीचे ए.एल.घाटे,कंधारचे एस.यु. जाधव यांच्याव्दारे निरीक्षण असणार आहेत.