आचारसंहिता लागली आता , तिकीटाची उत्सुकता शिगेला…मुखेड मध्ये….

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड राजकारण

मुखेड मध्ये होतेय खमंग चर्चा…

ज्ञानेश्वर डोईजड
              मुखेड : मुखेड – कंधार मतदार संघात भाजपाकडुन रामदास पाटील, आ. डॉ. तुषार राठोड, डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज, पंजाबराव वडजे,कॉग्रेसकडुन माजी आमदार हाणमंतराव पाटील बेटमोगरेकर, भाऊसाहेब पाटील मंडलापुर, शेषेराव चव्हाण व  शिवसेनेकडून बालाजी कार्लेकर, वसंत संबुटवाड तर वंचितकडुन प्रा. यशपाल भिंगे, डॉ. व्यंकट सुभेदार यांच्या नावाची चर्चा होत असुन दि. 21 रोजी आचारसंहिता लागल्याने तिकीटाची उत्सुकता शिगेला पाहोचली असुन कोणत्या पक्षाकडुन कोणाला तिकेट मिळेल याकडे जनतेत मात्र  खमंग चर्चा  होताना दिसत आहे .
                     मुखेड – कंधार मतदार संघात हटकर- धगनर समाजाचे प्राबल्य जास्त असले तरी या समाजाने विधानसभेची प्रतिनिधित्व आजपर्यंत केलेले नाही. त्यामुळे यशपाल भिंगे यांना उमेदवारी मिळाल्यास मुखेड – कंधार मतदार संघाचे चित्र बदलु शकते तर या मतदार संघात 60 ते 70 हजार मतदार हा हटकर – धनगर समाजाचा असुन त्यापाठोपाठ लिंगायत , मराठा, मागासवर्गीय, मुस्लीम, बंजारा असा मतदार आहे.