दिव्यांग शाळेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून केला निषेध
नांदेड / प्रतिनिधी
           नांदेड जिल्ह्यातील समाज कल्याण विभागांतर्गत चालत असलेल्या दिव्यांग शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना सातवा वेतन आयोग अद्याप शासनाने लागू केला नाही.तसेच मंत्रालयात दाद मागण्यासाठी गेलेल्या दोन कर्मचाऱ्यांनी न्याय न मिळाल्याने  आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला या निषेधार्थ कास्ट्राईब शिक्षक संघटना नांदेडच्या वतीने  काळ्या फिती लावून जिल्हाधिकारी, जि. प. मुख्यकार्यकारी व समाज कल्याण विभागाला निवेदन देण्यात आले.
                 समाज  कल्याण विभागांतर्गत आश्रमशाळा व दिव्यांगाच्या शाळा चालतात परंतु आश्रमशाळे ला सातवा आयोग लागू करण्यात आला असून अद्याप दिव्यांग शाळेत सातवा वेतन लागू झाला नाही .त्यामुळे 18 सप्टेंबर रोजी सामाजीक न्याय मंत्री यांच्या दालनात महाराष्ट्रातील दिव्यांग कर्मचाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली ही बैठक अचानक रद्द झाल्याचे कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले.त्यामुळे मंत्रालयात कोणिही आपली दाद एकूण घेण्यास तयार नसल्याने दोन कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला .एवढा मोठा प्रकार घडूनही संबंधित विभागाला जाग आली नाही या निषेधार्थ जिल्हाध्यक्ष विजयकुमार ढवळे  यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ व जि प .येथे मुख्यकार्यकारी अधिकारी यांचे प्रतिनिधी श्याम कावळे व शेख यांना तसेच समाज कल्याण विभागाचे गोडगोडवार यांना निवेदन देण्यात आले.
               या वेळी मुख्याध्यापक के. डी. वारभडे,एम. जी.ठाकूर, बी. एस. पवार,.बी.पी.पवार ,नामदेव फुलपगार, हावरगे, कांबळे पी. जी,सूर्यवंशी वाय. एस,सूर्यवंशी बी. आर, महेंद्र गायकवाड,समाधान शेरे,एस. पी. शगंगाखेडकर ,कांबळे व्ही.के, शिवराज बामणे,के.के.जोशी.शैलेंद्र संगतवार,डी. एम.राठोड, गोविंद गवाले,पी. आर.राठोड,एन डी. घोडेकर,बी. जी.केंद्रे. यांच्यासह अनेक कर्मचारी उपस्थित होते.