टीआरएसचा राज्यात चंचुप्रवेश; नांदेड जिल्ह्यात पाच जागा लढवणार…

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड राजकारण

वैजनाथ स्वामी

नांदेड – महापालिकेच्या २०१२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत हैदराबाद येथील एमआयएम पक्षाने नांदेड मार्गे राज्यात प्रवेश केला. याच एमआयएमने लोकसभा निवडणुकीत अॅड. प्रकाश आंबेडकरांच्या मदतीने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची दाणादाण उडवली. शिवसेनेचा औरंगाबादचा बालेकिल्ला एमआयएमने लोकसभेत उद्ध्वस्त केला. आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने हैदराबादमधीलच तेलंगणा राष्ट्र समिती हा पक्ष राज्यात पाय रोवू पाहत असून टीआरएसचा नांदेड जिल्ह्यात पाच जागा लढवणार असल्याची माहिती आहे.

राज्यात बहुतांश मतदार संघांत मुस्लिम मते निर्णायक आहेत. त्यामुळे एमआयएमची वाढ होणे म्हणजे मुस्लिम मतावर राजकारण करणाऱ्या पक्षांना हादरा बसण्याची भीती होती. नांदेडच्या यशानंतर एमआयएमने विधानसभा निवडणुकीत सहभाग घेतला आणि त्यांचे दोन आमदार विजयी झाले. एमआयएम राज्यात फोफावत राहिली. लोकसभा निवडणुकीत अॅड्. प्रकाश आंबेडकरांच्या रूपाने दलित गठ्ठा मतेही एमआयएमच्या मागे उभी राहिली. त्यातून काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठा धक्का सहन करावा लागला.

जिल्ह्यात पाच जागा लढवणार :

कदम यांना नायगाव मतदार संघाची उमेदवारी दिल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील अनेक गावात आज मुलभूत सुविधाही नाहीत. रस्ते, वीज, पाणी, सिंचनाच्या सोयी आदींचा अभाव असल्याने या भागात अठराविश्वे दारिद्र्य आहे. त्यामुळे कदम यांच्या सरपंच संघटनेने ४० गावे तेलंगणाला जोडावीत अशी मागणी केली. या मागणीने चांगलीच खळबळ माजली. सेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी याची दखल घेऊन पालकमंत्री रामदास कदम यांना लक्ष देण्यास सांगितले. रामदास कदम यांनी आढावा बैठक घेऊन या भागाच्या विकासासाठी ४० कोटीचा निधी देण्याचे आश्वासन दिले. त्या निधीतून या भागात रस्ते, वीज आदींची कामे होणार होती. परंतु तो निधी आजवर मिळाला नाही. त्यामुळे या भागात असंतोष आहे. टीआरएसचा प्रवेश या असंतोषाचा जनक आहे. टीआरएसला राज्यात फार मोठा पाठिंबा मिळणार नाही. परंतु राज्याच्या मागासलेपणाचा मुद्दा टीआरएसने ऐरणीवर आणला हे मात्र मान्य करावे लागेल.

विकासाचा असंतोष म्हणून टीआरएस एमआयएमच्या पाठोपाठ आता टीआरएसही राज्यात येऊ पाहत आहे. धर्माबाद येथील सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष बाबाराव कदम यांनी चंद्रशेखरराव यांची मंगळवारी भेट घेऊन विधान सभा निवडणुका लढवण्याची विनंती केली. मुख्यमंत्री चंद्रशेखरराव यांनी त्याला संमती दिल्याचा दावा कदम यांनी केला.