उद्योग प्रशिक्षणाचे आयोजन

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या मुखेड
नांदेड : वैैजनाथ स्वामी
               मिटकॉन आयोजित व जिल्हा उद्योग केंद्र पुरस्कृत उद्योगास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत अनुसूचित जाती व सर्वसाधारण घटकातील सुशिक्षीत बेरोजगार युवक व युवतींसाठी ब्युटीपार्लर, फ्रीज आणि कुलर दुरुस्ती, पेपर व कॉटन बॅग मेकींग, केळी प्रक्रिया, रेडीमेट गारमेंटस, मोटार रिपेरिंग, दुचाकी दुरुस्ती, फ्रेब्रीकेशन, बेकरी, डेरी प्रॉडक्ट, फुड प्रोसेसिंग, ऑफसेट प्रिटींग, इलेक्ट्रीशीन आणि इलेक्ट्रीनिक होम अप्लासेस, मोबाईल रिपेरिंग, एसी व कुलर रिपेरिंग, मसाला मेकींग, हेअर टिटमेंट ॲड हारबल कॉस्मीक आदी आधारीत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
           प्रशिक्षण प्रवेश किमान सातवी उत्तीर्ण. वय 18 ते 45 वर्षे. जातीचे प्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र, आधारकार्ड, बॅक खाते असणे आवश्यक आहे. प्रशिक्षणाची निवड करताना अपंग महिला, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य, सांसद ग्राम, आदर्श ग्राम, भुमीहीन शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल. इच्छुकांनी आवश्यक सर्व कागदपत्रे मिटकॉन कार्यालय नांदेड येथे सादर करावीत. इच्छूक युवक व युवतींनी अधिक माहितीसाठी जिल्हा समन्वयक मिटकॉन लि. नांदेड यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा समन्वयक मिटकॉन लि. नांदेड यांनी केले आहे.