देगलुर बिलोली मतदार संघात युवकांची प्रचार घौडदौड सुरू… भिमराव क्षिरसागर यांना वाढता पाठींबा

देगलूर नांदेड जिल्हा मुखेड
देगलूर / प्रतिनिधी
                आपल्या देशात कोनतीही चळवळ असो त्यात प्रामुख्याने युवकांचा सक्रीय सहभाग असतो.युवक हा देशाचा कणा असुन युवा शक्तीच बदल घडवु शकते आपन इतिहासात डोकावुन पाहु शकतो.
                सध्या राज्यात विधानसभेचे वारे जोराने वाहु लागले आहे.सरकारने निवडनुकीचे रनशिंग फुंकले असुन आता सर्व पक्षिय नेते कार्यकर्ते जोरात तयारीला लागले आहेत.देगलुर बिलोली मतदार संघात देखिल हे चित्र वेगळे कसे असेल.हा मतदारसंघ राखिव असल्यामुळे या वेळी आमचा आमदार कोन असावा हि चर्चा युवकामध्ये सोशल मिडीयाच्या माध्यमातुन जोर धरत आहे..
          एकंदरीत सर्वे केला तर..या मतदारसंघात भिमराव क्षीरसागर यांच्या नावाची चर्चा जोर पकडत असुन भावी आमदार म्हणुन युवक भिमराव यांचेकडे पाहत आहेत.भिमराव यांची वाढती चर्चा आता नांदेड जिल्ह्यात रंगु लागली आहे.भाजपा पक्षाने जर पुन्हा संधी दिली तर त्या संधिचे सोने करू असे मत सामान्य कार्यकर्त्याकडुन देखिल ऐकायला मिळत आहे.