मुखेडात 6 लाख 93 हजाराचा गुटखा जप्त

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड / ज्ञानेश्वर डोईजड

मुखेड तालुक्यातील जांब बु मार्गे दि १५ रोजी अवैधरित्या गुटखा जात असल्याची गोपनीय बातमी पोलिसांना मिळाली त्या माहितीच्या आधारे  सायं 6 वाजता पोलिसांंनी धाड टाकून   6 लाख 93 हजाराचा गुटखा जप्त करण्यात आला.

सविस्तर वृत्त असे की , दिनांक 15 सप्टेंबर रोजी गुप्त बातमीदार मार्फत माहिती मिळाली की एक इसम जांब बु मुखेड मार्गे नांदेड येथे शक्तिमान कंपनीची गाडीने महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या गुटखा घेऊन जात आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने मुखेड पोलीस पोलीस निरीक्षक नरसिंग आकुसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशन येथील पोलीस उपनिरीक्षक मिथुन कुमार सावंत,  पोलीस उपनिरीक्षक गजानन काळे,  पोलीस कॉन्स्टेबल सिद्धार्थ वाघमारे यांनी जांब ते मुखेड जाणारे रोडवर शिकारा पाटी येथे थांबले असता शक्तिमान कंपनीची गाडी क्रमांक एम एच – 26 – E – 4752 गाडीयेत असताना सदर गाडी थांबून गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या गुटखा व गाडी असा एकूण अंदाजे 6 लाख 93 हजार रुपयाचे मुद्देमालासह मिळून आला असून सदरची माहिती अन्न सुरक्षा अधिकारी अन्न व औषधी प्रशासन महाराष्ट्र राज्य नांदेड यांना दिलेली असून पुढील कार्यवाही मुखेड पोलीस स्टेशन करीत आहे.