मुखेड तहसील कार्यालयाचे नुतन इमारतीत स्थलांतर  जनतेकडून तहसिलदार सह कर्मचाऱ्यांचे स्वागत

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
 मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड
     नुतन इमारतीत तहसील कार्यालयाचे प्रलंबित स्थलांतर आज (दि.१६) करून कामकाजास प्रारंभ केल्याबद्दल जनतेकडून तहसीलदार काशिनाथ पाटील सह सर्व कर्मचाऱ्यांचे सत्कार स्वागत करण्यात आले.
      अनेक वर्षांपासून कोट्यावधी रुपये खर्च करून बांधकाम झालेल्या सुसज्ज नुतन इमारतीत तहसील कार्यालयाचे स्थलांतर या न  त्या कारणाने प्रलंबित होते. महसूल कर्मचारी संघटना,  ‘रयत’ क्रांती युवक संघटना च्या मागणीनंतर प्रशासनाने गतीमान पावले उचलत ताबडतोब नुतन इमारतीत तहसील कार्यालयाचे स्थलांतर करून कामकाजास प्रारंभ केला. यावेळी प्रशासनाने कुठलेच उद्घाटनाचा फार्स न करता प्रशासकीय पातळीवर साध्या पद्धतीने नुतन इमारतीत प्रवेश करून नागरिकांची गैरसोय दुर केल्याबद्दल येथील सामाजिक कार्यकर्ते डाॅ.श्रावण रॅपनवाड यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार काशिनाथ पाटील, नायब तहसीलदार पी.डी.गंगनर, शेख सह सर्व कर्मचाऱ्यांचे जनतेच्या वतीने सत्कार स्वागत करण्यात आले. यावेळी माधवराव पा.उंद्रीकर, दिलीप कोडगीरे, किरण पाटील बोडके, जयभीम सोनकांबळे, असद बल्खी, विशाल गायकवाड, पत्रकार रियाज शेख, सुनिल आरगीळे,  हाफिज खान पठाण आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


   तहसीलदारांचा धाडसी निर्णय – डाॅ.रॅपनवाड
 तहसील कार्यालयाची नुतन इमारत पुर्ण होऊन तीन वर्ष लोटल्यानंतरही लालफितीच्या प्रतीक्षेत स्थलांतर अडकून पडले होते. दरम्यान नागरिकांची व कर्मचाऱ्यांची प्रचंड गैरसोय होती. परंतु तहसीलदार काशिनाथ पाटील यांच्या प्रशासकीय व धाडसी निर्णयामुळे सदर गैरसोय दुर झाली. असे मत डाॅ.श्रावण रॅपनवाड यांनी व्यक्त केले.


निवडणूक पार्श्वभूमीवर स्थलांतर – तहसीलदार पाटील
    जनतेची, महसूल कर्मचाऱ्यांची व प्रशासनाची गैरसोय लक्षात घेऊन आगामी विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर अपुऱ्या जागेअभावी सदर स्थलांतर केल्याची माहिती तहसीलदार काशिनाथ पाटील यांनी दिली.