मुखेड येथील शिवसमर्थ पतसंस्थेची सर्वसाधारण सभा संपन्न 

इतर बातम्या नांदेड जिल्हा मराठवाडा मुखेड
मुखेड : संदिप पिल्लेवाड
          मुखेड येथील मातोश्री मंगल कार्यालय येथे १५  सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता शिवसमर्थ शिक्षक व कर्मचारी सहकारी पतसंस्थेची ३३ वी सर्वसाधारण वार्षिक सभा संपन्न झाली .
          या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे चेरमन  भागवत पाटील हे होते तर प्रमुख पाहूणे म्हणून माजी सभापती अॅड.बळवंतराव पाटील बेटमोगरेकर, जिल्हाध्यक्ष गौतम काळे ,प्राचार्य मनोहर तोटरे , शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष  दिलीप देवकांबळे, शिवाजी पाटील बेळिकर, जिल्हा पतसंस्थेचे चेअरमन नीळकंठ चोंडे, पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष समर्थ कदम , निबंधक कार्यालयाचे नारायण होनराव,  माजी नगराध्यक्ष गणपतराव गायकवाड, शिक्षण विस्ताराधिकारी जि.एच.होनराव, सेवानिवृत्त   शिक्षण विस्ताराधिकारी एन.एस. गायकवाड, सहकारी पतसंस्थेचे संचालक व्यंकट गंदपवाड,नरसिंग सोनटक्के,दिपक लोहबंदे, मुख्याध्यापक जि.सी. चव्हाण, सिंधुताई येवतिकर, गणेश पाटील आदी उपस्थिती होती.

               यावेळी अँँड बळवंत पाटील बेटमोगरेकर गौतम काळे दिलीप देव कांबळे नीळकंठ प्राचार्य मनोहर तोत्रे समर्थ कदम व कार्यक्रमाचे अध्यक्ष भागवत पाटील ,सय्यद अली शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी कराळे यांनी केले तर कार्याक्रमाचे प्रास्ताविक भागवत पाटील व आभार दिलीप देव कांबळे यांनी मांडले. यावेळी यावेळी   शिवसमर्थ शिक्षक व कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.