रामदास पाटील यांनी घेतले बंजारा समाजाचे दैवत महातपस्वी डॉ. रामराव महाराज यांचे दर्शन

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

   मुखेड : संदिप पिल्लेवाड

       मुखेड – कंधार मतदार संघात निवडणूकीसाठी ईच्छुक उमेदवार असलेले हिंगोली येथील मुख्याधिकारी पदी असलेले रामदास पाटील यांनी बंजारा समाजाचे दैवत बालब्राम्हचारी महातपस्वी डॉ. रामराव महाराज यांचे पोहरादेवी गड येथे जाऊन दर्शन घेतले तर त्यांच्यासोबत राष्ट्रीय बंजारा परिषदचे प्रदेशाध्यक्ष डॉ. मोहन चव्हाण यांची उपस्थिती होती.


      या भेटीत विविध सामाजिक विषयावर चर्चा झाली असून मुखेड – कंधार विधानसभेसाठी रामदास पाटील यांनी भाजपकडे उमेदवारी मागीतली असून त्यांचा आशीर्वाद त्यांना मिळाला असल्यामुळे त्यांचा विजय सुद्धा निश्चित असल्याचे त्यांच्या समर्थकडून मानल्या जात आहे.