अजित पवारांविरोधात शिवसेनेकडून ‘हा’ नेता उतरणार

मराठवाडा राजकारण राष्ट्रीय

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जर भाजपसोबत युती झाली नाही तर शिवसेना स्वबळावर निवडणूक लढणार आहे . यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या बारामती मतदारसंघात शिवसेनेनी तयारी सुरु केली आहे.

 

शिवसेनेतर्फे दिलीप नाळे यांचासारख्या अभ्यासू , होतकरु व प्रामाणिक तरुण नेतृत्वास निवडणूक लढण्याची संधी दिली जाणार असल्याची चर्चा सुरु आहे .

बारामतीमध्ये पवार कुटुंबीयांची ५० वर्षांपासून एकहाती सत्ता आहे . मात्र येथील जिरायती भागातील जनता लोकप्रतिनिधीवर नाराज असल्याचे दिसते . त्यामुळे शिवसेना जिरायती भागातील उमेदवारी देऊन बारामतीच्या जिरायती भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, शेती सिंचनाचा, रोजगारासारख्या विविध प्रश्नावर लक्ष वेधले जात आहे . याकरिता शिवसेनेकडून होतकरु व प्रामाणिक तरुण नेतृत्वास निवडणूक लढण्याची संधी मिळावी अशा प्रतिक्रीया समाजातून येत असताना दिलीप नाळे यांचासारख्या अभ्यासू होतकरु शिवसैनिकास बारामती विधानसभा निवडणूकीत संधी मिळायला हवी , अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे .