मुखेडात डिजे व गुलाल विरहित पुष्पांच्या वर्षावात श्री गणेशाचे शांतीतेत विसर्जन ….. मुखेड पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्तासह अनोखा उपक्रम

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड
       मुखेड पोलिस स्टेशन अंतर्गत  शहरी भागात २६ ठिकाणी  तर ग्रामीण भागांमध्ये ९३  ठिकाणी  असे एकूण ११९ ठिकानी  श्रीगणेसाची स्थापना करण्यात आली होती तर आकरा दिवसाच्या नंतर शहरात २४ तर ग्रामीन भागातील ४ ठिकानी श्रीचे विसर्जन करण्याचे होते यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने ९५ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्तात अनोखा उपक्रम राबवला या मध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीने प्रतेक गणेश मंडळालला गुलालाच्या अवेजी  पुष्पांचा वर्षाव करण्यासाठी पुष्प देण्यात आले या मुळे सर्वच गणेश मंडळाने डिजे व गुलाल विरहित पुष्पाचा वर्षाव करीत श्रीनां शांतेतेत विसर्जित करण्यात आले.
       तालुक्यात सकाळपासूनच श्रीचे विसर्जन करण्यासाठी भक्तगण धावपळीत होते तर पोलीस प्रशासन काही अनुचित प्रकार घडूनये म्हणून प्रतेक बाबींवर करडी नजर ठेवत प्रतेक गणेश मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या संपर्कात होते. व गुलाला मुळे व मिरवणूकी मुळे कोणत्याही समाजाच्या भावणा दुखू नये म्हणून शांतता कमीटीची बैटक आयोजित केली होती या बैठकीला नांदेड जिल्ह्याचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक दत्तराम राठोड यांनी मार्गदर्शन केले होते.तर यावेळी सर्वच समाजातील कार्यकर्ते व गणेश मंडळाचे अध्यक्षांची उपस्थिती होते राठोड यांनी मार्गदर्शनात सामजिक एकोपा जोपासत गुलाल व डिजे विरहित गणेश उत्सव साजरा करा असे सांगितले होते .


         तर मुखेड पोलीस स्टेशच्या वतीने पोलीस निरिक्षक नरसिंग आकुसकर यांच्या मार्गदर्शनात सपोनी भाऊसाहेब मरगे, पोलीस उपनिरीक्षक असद शेख, मिथुनकुमार सावंत, गजानन काळे, अनिता ईटुबोने, एस.ए.पालेकर, ५५ पोलीस कर्मचारी व ३४ होमगार्डसह शहरातील शांतता कमिटीचे सदस्य यांनी सर्वच गणेश मंडळावर व मिरवणूकीवर लक्ष ठेवीत श्रीचे विसर्जन शांततेत पार पाडले.