‘मंदीमुळे नोकऱ्या गेल्या, बेरोजगारी वाढली आता तुम्हीचं ठरवा कोणाच्या पाठीशी उभे राहायचे’- जयंत पाटील

मराठवाडा राजकारण राष्ट्रीय

आज नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाराष्ट्रात सर्व ठिकाणी जाऊन वेळवेगळे प्रकल्प जाहीर करण्याचे काम हे सरकार करीत आहे.

 

लोकांना आम्ही काहीतरी करीत आहोत असे दाखविण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र राज्याच्या प्रमुखांनी जाहीर केलेला एकही प्रकल्प या विधानसभा निवडणुकीपूर्वी पूर्ण होणार नाही. यावरुनच त्यांच्या कार्यक्षमतेची पात्रता आपल्याला समजून येते असेही म्हणाले.

 

ज्यांच्या गाडीवर कायमच पवार साहेबांच्या आशीर्वादाने लाल दिवा होता, असे लोक आज आमचा पक्ष सोडून स्वार्थासाठी दुसऱ्या पक्षात गेले. अनेकजण तर कोणत्या ना कोणत्या चौकशीच्या भीतीने जात आहेत. एका बाजूला सत्ता उपभोगता आणि दुसरीकडे सत्ता गेल्यावर दुसऱ्या बाजूला जातात असं पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, नगरसेवक जात आहेत म्हणून त्यांच्या मागे मी चाललो आहे असे सांगणारे लोक कधीच नेते होऊ शकत नाहीत. स्वार्थापोटी पक्ष सोडून जाणाऱ्या  लोकांना नवी मुंबईची जनता कधीच लक्षात ठेवणार नाही व त्यांना येत्या काळात नक्कीच धडा शिकवेल असंही विधान पाटील यांनी केले आहे.