भारतासोबत युद्ध झालं तर पाकिस्तानच हरेल- इम्रान खान…. भारताची घेतली पाकने धास्ती

महाराष्ट्र राजकारण राष्ट्रीय

इस्लामाबाद : जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तान सतत भारताला युद्धाची धमकी देत आहे. मात्र पाक भारताशी युद्धात जिंकू शकत नाही, असं खुद्द पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटलं आहे.

पाकिस्तान कधी स्वत:हून अणू युद्धाची सुरुवात करणार नाही, असं मी म्हटलं होतं. यामध्ये कुठलीही शंका नाही. मी एक शांतताप्रिय व्यक्ती आहे, असं इम्रान खान म्हणाले होते.

मी युद्धाच्या विरोधात आहे. युद्धाने समस्या सुटत नसतात, असं मी मानतो.युद्धाचे अत्यंत वाईट परिणाम पाहायला मिळतात, असं इम्रान खान यांनी म्हटलं आहे.