‘आता कार्यकर्त्यांनी आता एकत्र येऊन काम करायला हवं’ – शरद पवार

महाराष्ट्र राष्ट्रीय

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे वारे सुरु झाले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी आतापर्यंत भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला . हे पाहता ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. आता संकटात सापडलेल्या राष्ट्रवादीला नवसंजीवनी देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार स्वत: मैदानात उतरले आहेत. आता कार्यकर्त्यांनी आता एकत्र येऊन काम करायला हवं , असे आवाहन त्यांनी केले.