मुखेड तहसिलचे काम नवीन इमारतीत सुरु करावे  – रयत क्रांती संघटनेची मागणी

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड – संदिप पिल्लेवाड
     मुखेड तहसील कार्यालयाची नवीन इमारत बांधकाम पुर्ण होऊनही बराच कालावधी उलटला तरिही त्याठिकाणी नुतन इमारतीत जनतेसाठी खुली करण्यात आली नाही त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे जनतेची होत असलेली गैरसोय थांबविण्यासाठी तहसिल अंतर्गत होणारे सर्व  कामकाज नविन इमारतीत करावे अशी मागनी रयत क्रांती संघटनेनी केली आहे.
     नविन ईमारत शहरच्या मध्यभागी आहे तर सध्याची   इमारत शहरापासून दूर असल्यामुळे नगर परिषदेच्या इमारतीत आहे त्यामुळे  खेड्या पाड्यातून येणाऱ्या नागरिकांची खूपच गैरसोय होत आहे.नवीन इमारतीचे काम पूर्ण झाले आहे.ही इमारत जनतेच्या कामासाठी सुरू केली तर खेड्यातून येणाऱ्या नागरिकांची होणारी हेळसांड थांबेल.या मुळे तात्काळ ही  कार्यवाही करावी असे रयत क्रांती कडून  नायब तहसीलदार आर.आर.पदमवार यांना  निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली
     यावेळी सोबत रयत क्रांती संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष शिवशंकर पाटिल कलंबरकर, शहराध्यक्ष संजय पिल्लेवाड,  महेताब शेख,चेअरमन रमाकांत पाटील जाहुरकर, विरेण पाटील, संदीप पिल्लेवाड ,फेरोज मुजावर,सद्दाम शेख, अहेमद आत्तार सावरगावकर आदी उपस्थित होते.