काँग्रेसचे नेते सत्यजित देशमुख भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता..?

नांदेड जिल्हा महाराष्ट्र राजकारण राष्ट्रीय

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे मोठे नेते आणि प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे .

सत्यजित देशमुख यांनी आगामी वाटचालीबाबत निर्णय घेण्यासाठी आज शिराळा येथे कार्यकर्त्यांचा विशेष जनसंवाद मेळावा आयोजित केल्याची माहिती आहे. त्यानंतर, सोमवारी ते महाजनादेश यात्रेदरम्यान भाजपामध्ये प्रवेश करतील असं सांगितलं जात आहे.