मुखेड- कंधार विधानसभा युतीत शिवसेनाच लढविणार :- संपर्कप्रमुख आंनद जाधव

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
 – शिवसैनिकांनी जोमाने कामाला लागावे – 
:ज्ञानेश्वर डोईजड :
           मुखेड : मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला असुन येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुखेडचा मतदारसंघ युतीमध्ये शिवसेना लढविणार असुन कोणत्याही परिस्थितीत मुखेड विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकविणार असुन शिवसैनिकांनी शिवसेनेचा भगवा झेंडा फडकविण्यासाठी जिवाचे रान करावे असे आवाहन उपस्थित शिवसैनिकांना जिल्हा संपर्क प्रमुख आंनद जाधव यांनी दि १३ रोजी मुखेड येथील
कार्यकर्ता मेळाव्यात केले.
      आंनद जाधव पुढे बोलताना म्हणाले मागील पाच वर्षाच्या काळात सत्तेत ५० टक्के वाटा असताना शिवसैनिकांवर अन्याय करणाऱ्याची गय केली जाणार नसून येणाऱ्या निवडणुकीत त्यांना धडा शिकविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशाराही जाधव यांनी दिला ते शिवसेना युवासेनेच्या वतीने मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी मुखेड येथे बोलताना व्यक्त केले दरम्यान नागरजांब येथील असंख्य शिवसैनिक शिवसेनेत प्रवेश केले .
            या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हासमन्वयक धोंडु पाटील हे होते तर उदघाटक म्हणुन जिल्हासंपर्कप्रमुख आंनद जाधव,जिल्हाप्रमुख उमेश मुंढे, उपजिल्हाप्रमुख भालचंद्र नाईक, संजय बेळीकर, जिल्हा संघटक व्यंकटराव लोहबंदे,  रंविद्र भिलवंडे, माधव मुसळे, सचिन किसबे,  भागवत जाधव, शंकर पोतदार, अतुल देबडवार, समन्वय समिती अध्यक्ष शंकर पाटील लुट्टे यांची प्रमुख उपस्थिती होती.
            जिल्हा संपर्क प्रमुख आंनद जाधव यांचा सत्कार उपजिल्हाप्रमुख संजय बेळीकर व शहरप्रमुख नागनाथ लोखंडे यानी केला कार्यक्रमाचे प्रस्तावीक शंकर पा.लुट्टे यांनी केले यावेळी बोलताना म्हणाले की शिवसेना ही मर्दाची आहे मुखेड मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणी यापुढे रहाणारच शिवसेना भाजप युतीमध्ये २५ ते ३० जागेची आदलाबद्दल होणार असुन मुखेडची जागा शिवसेनेला सोडवुन घेण्याचा प्रयत्न चालु असुन कुठल्याही परिस्थितीत हि जागा शिवसेना लढविणार आहे .


           युतीममध्ये ५० टक्के जागा असतानाही येथील आमदाराने एकाही शिवसैनिकाला न्याय दिला नाही कुठल्याही विकासकामात कार्यक्रमात शिवसैनिकांना सन्मानाची वागणूक दिली नाही केवळ निवडणुकीत शिवसेनेचा वापर करुन घेतला असुन शिवसैनिकावर अन्याय करणाऱ्यास आगामी निवडणुकीत त्यांची जागा दाखवु भाजपाच्या विद्यमान आमदाराला शिवसैनिकांचा विरोध रहाणार असुन चालु आमदाराला सोडून बाकी युतीमधील कोणत्याही उमेदवाराला तिकीट द्या अशी पक्षश्रेष्ठीकडे मागणी करणार आहोत यावेळी उमेश मुंढे, धोंडु पाटील,भालचंद्र नाईक, यांनीही मुखेडची जागा शिवसेनाच लढविणार असे सुतोवाच केले मेळाव्यासाठी तालुकाप्रमुख बालाजी पा.कबनुरकर, बालाजी पसरगे, राजु गंदपवाड, अंतेश्वर पाटील, शंकर चिंतमवाड, सतीष डाकुरवार, मिंलीद लोहबंदे, कृष्णा कामजे, नरेश इंगोले, रवी गंदपवाड, आदिसह शेकडो शिवसैनीक उपस्थित होते दरम्यान उपस्थित शिवसैनिकांनी मुखेड विधानसभेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकविणारच असा निर्धार केला . 
………………………………………………………………………………………………………………. विद्यमान आमदारांना उमेदवारी नको – संजय बेळीकर
        मुखेड – कंधार विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला असून मागील पाच वर्षात विद्यमान आमदारांनी शिवेसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याला अपमानस्पद वागणूक दिली असून जर भाजपने आमच्यावर उमेदवार लादण्याचा प्रयत्न केला तर एकही शिवसैनिक काम करणार नसल्याचे शिवसेना उपजिल्हा प्रमुख संजय बेळीकर यांनी  जिल्हा संपर्क प्रमुख आंनद जाधव यांच्याशी बोलताना म्हणाले.