डोरनाळी येथे मोहरम सण, उत्साहात तर गणपती बाप्पाला निरोप  

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
डिजे, गुलाल विरहित,पुष्पांचा वर्षाव करीत ढोल ताशाच्या गजरात निरोप
मुखेड : संदिप पिल्लेवाड
           हिंदु-मुस्लिम एकतेच प्रतिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  गणेश उत्सव व मोहरम सण डोरनाळी येथे मोठ्या हर्षोउल्हासात साज-या केल्या जातो त्याचनुषंगाने गावातील सर्व समाजबांधव एकत्रित येवुन दि.८ स्पटेंबर रोजी डिजे व गुलाल विरहित ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत गणरायाला निरोप दिला त्याचबरोबर दि.१० स्पटेंबर रोजी मवलाली पिरांची सवारी मोहरम ताजीया गावकऱ्यांच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आली .

     डोरनाळी येथे प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षि गणेश उत्सव व मोहरम सण  नाचत, गाजत, वाजत, शांततेत सर्व सामजातील समाज बांधवाकडुन एकदुस-यांना उत्सवाच्या शुभेच्छा देत  उत्साहात साजरा करण्यात आला त्याचबरोबर डोरनाळी ह्या गावात कोणताही सण असो किंवा जंयती उत्सव असो सर्व जाती धर्मातील नागरिक एकत्रित येवून माणूस हाच आमचा धर्म म्हणुन सण उत्सव मोठया उत्साहात साजरे करतात डोरनाळी या गावाकडे पंचक्रोशीत, व परिसरात हिंदु मुस्लिम एकतेच प्रतिक म्हणुन पाहिल्या जाते प्रतिवर्षाप्रमाणे अंनत चतुर्तिच्या दिवशी गावकऱ्यांच्या वतीने श्रि.गणेशाची स्थापना करण्यात आली त्यानंतर सात दिवस आरती,पूजा,आर्चा केल्यानंतर दि.८ स्पटेंबर रोजी श्रि गणेशाच्या मूर्तीची गावातून ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढत गणपती बाप्पा मोरय्या,पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात  गणरायाला शांततेत निरोप देण्यात आला.
                  त्याचबरोबर गावातील आणखी एक श्रृद्देच स्थान म्हणजे मवलाली पिरांची सवारी दर्ग्यांत सवारिची स्थापना केल्या जाते याठिकाणी गावातील नागरिकासह, बाहेरगावाहून भक्त दर्शनासाठी येतात तसेच मवलाली पिरांची सवारी ही गावातील सर्व समाजातील लोक मोठया संख्येने सहभाग नोंदवून मोहरम उत्साहात साजरा  करतात तसेच आमच्या गावात सर्व धर्म समभाव असुन आमच गाव आमचा परिवार असल्याचा अनमोल संदेश येथील नागरिक देतात म्हणुन डोरनाळी हे गाव सदैव  चर्चेत असतो त्याचबरोबर रविवारी पार पडलेल्या श्रि गणेश विसर्जन मिरवणुकीत व मंगळवारी साजरा करण्यात आलेल्या मोहरम ताजियामध्ये गावातील जेष्ठ नागरिक, युवक, महिला व बालकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवत दोन्ही उत्सव शांततेत संपन्न करण्यात मोलाची भुमीका बजावली