नारनाळी गावातील शेतकऱ्यांंना पुलाअभावी करावा लागतो अडचणींचा सामना …….. मुखेड पासुन 7 कि.मी. अंतरावर आहे नारनाळी गाव

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड
               मुखेड – कंधार मतदार संघातील नारनाळी या गावातील शेतकऱ्यांंना , नागरीकांना ये – जा करण्यासाठी पुलच अस्तित्वात नसल्यामुळे पावसाळयात अनेक अडचणींचा सामना करावा लागत असुन अनेक पुढाऱ्यांंना निवदने सुध्दा याचा काहीच फायदा झाला नाही.
              नारनाळी हे गांव मुखेड पासुन 7 कि.मी. अंतरावर असुन सध्या हे गांव कंधार तालुक्यात आहे. पाऊस आला आणि तालुक्याच्या ठिकाणी जायचे म्हटले की येथील शेतकऱ्यांंना , नागरीकांना तारेवरची कसरत करावी लागते. या पुलाबाबत येथील सरपंच, नागरीक व सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेक नेत्यासोबत चर्चा करून निवेदने दिली पण याबाबत ढोस पाऊले उचलली नसल्याची येथील गावकऱ्यांंनी सांगितले.


        सदर रस्ता न झाल्यामुळे शेतीसाठी, दळणवळणासाठी, गोणार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात येण्यासाठी अशा अनेक समस्यांना नारनाळी गावातील नागरीकांना तोंड दयावे लागत आहे.अनेक 
पुढारी यांच्या सोबत चर्चा करून निवेदन दिले पण सगळे निष्पळ झाले आहे .  नारनाळी येथील पुल झाल्यास गावातील शेतक­ऱ्यासहीत नागरीकांच्या दळणवळणाच्या अडचणी सुटतील. 
                                    भुजंग दत्ता देव्हारे
                                 माजी उपसरपंच, नारनाळी


                      आमच्या गावातील बहुतांश शेतक­ऱ्यांंच्या जमीनी पुलाच्या पलीकडे आहेत. हा पुल झाल्यास      शेतक­ऱ्यांंसाठी वरदान ठरेल. सदर रस्ता मसलगा गावाशी जोडलेला असल्याने याचा खुप मोठा फायदा येथील नागरीकांना सुध्दा होईल. 

                                               नारायण खाका सोमवारे
                                                     सरपंच, नारनाळी