भिमराव क्षीरसागर यांच्या झंझावाता समोर विरोधक गायब

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

गावोगावी भेटीत उत्तम प्रतिसाद , प्रभावी प्रचार यंत्रणा

देगलूर / प्रतिनिधी 
        देगलुर बिलोली या राखीव मतदार संघात जर भिमराव क्षीरसागर यांना भाजप ने पुन्हा संधी दिली तर भिमराव यांचा विजय निश्चित मानल्या जात असन त्यांच्या झंझावाता समोर विरोधक दिसेनासे झाले असल्याचे चित्र या मतदार संघात दिसत आहे. 

       भिमराव क्षीरसागर हे मागील अनेक दिवसांपासून या मतदारसंघात येणाऱ्या प्रत्येक गावाला भेटी देत आहेत.त्यांचा वाढता जनसंपर्क विरोधकासांठी डोकेदुखी ठरत आहे.भिमराव हे पुण्यात मोठे उद्योजक असून देखील त्यांची नाळ त्यांच्या मतदार संघात जोडलीली आहे. प्रत्येक कार्यकर्त्याच्या सुख दुःखात भिमराव सहभागी होतात त्या मुळे लहान मोठ्यांचा जमाव सतत सोबत तोबा गर्दी करत आहे.भिमराव यांचा राजकीय क्षेत्रात दांडगा अनुभव असल्यामुळे व मागील विधानसभा लढवली आहे.

      मागील वेळी थोड्या फरकाने ते पराजित झाले. अनेक बड्या नेत्याशी आणि उद्योजकांशी असलेली मैत्री ही त्यांना फायदेशीर ठरेल यात शंका नाही.असे स्थानिक मतदारा कडून ऐकायला मिळत आहे.