डॉ. कैलास चांडोळकर व सौ. आरती चांडोळकर या डॉक्टर दांम्पत्यांची ग्रामीण भागात ” अधिराज बाल रुग्णालय व प्रसुतीगृहाच्या” माध्यमातून सातत्य सेवा…

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
          दिव्यत्वाच्या जिथे प्रचिती !
                 तिथे कर माझे जुळती !!

                     मुखेड तालुका तसा वाडी तांडयाचा तालुका या भागातील रुग्णांची सेवा याच तालुक्यात व्हावी असे कै. भारत पाटील यांची मनापासुन ईच्छा होती त्यांनी त्याच दिशेने पाऊल टाकत चांडोळा येथे महात्मा गांधी विद्यालयाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडविले त्यातच त्यांचा मुलगा कैलास चांडोळकर.
               डॉ. कैलास चांडोळकर व डॉ. सौ. आरती कैलास चांडोळकर यांचे वैद्यकिय शिक्षण पुर्ण झाल्यानंतर ते लगेच नांदेड येथे मोठा दवाखाना टाकले असते पण कै. भारत पाटील चांडोळकर यांच्या प्रेरणेने व या डॉक्टर दांम्पत्यांनी सुध्दा ठरविले की मुखेड तालुक्यातील रुग्णांची सेवा मुखेडमध्येच राहुन केली पाहिजे. त्यामुळे त्यांनी सेवेचे ठिकाण सुध्दा मुखेड निवडले.
              डॉ. कैलास भारत पाटील (चांडोळकर) यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मुखेड तालुक्यातील चांडोळा या ग्रामीण भागात झाले. बारावी विशेष प्राविण्य गुणासह शाहु कॉलेज लातुर येथे झाल्यानंतर त्यांचे एम.बी.बी.एस. हे एमजीएम औरंगाबाद येथे झाले तर त्यांचे डि.सी.एच. मुंबई येथे झाले. तर डॉ. सौ. आरती भारत चांडोळकर यांचे मुळ गाव बिलोली तालुक्यातील केसराळी असुन पहिली ते दहावी नांदेड येथील नेहरु इंग्लीश स्कुल मध्ये झाले असुन बारावीचे शिक्षण अहमदपुर येथील महात्मा गांधी विद्यालय येथे झालेले आहे तर वैद्यकिय क्षेत्रातील एम.बी.बी.एस. शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, अकोला तर डि.जी.ओ. चे शिक्षण एम.जी.एम. औरंगाबाद येथे पुर्ण केले आहे.
                     स्व.कै.भारत पाटील चांडोळकर यांना नेहमी वाटायचे तालुक्यातील अनेक रुग्णांना नांदेड येथे जावे लागत आहे. नांदेड येथे मोठी फी येथील रुग्णांना दयावी लागत आहे. नांदेडच्या सुविधा मुखेडमध्ये झाल्या पाहिजे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलास व सुनबाईस मुखेड येथे दवाखाना टाकण्यास सांगीतले. यापुर्वी शिवाजी नगर येथे या दाम्पत्यांनी दवाखाना टाकला. कमी वेळात चांगली आरोग्य सुविधा देऊन या डॉ. चांडोळकर दाम्पत्यांनी मुखेडकरांना आपलेसे केले.
                त्यात डॉ. कैलास पाटील चांडोळकर यांनी अनेक जन्मत: न रडलेल्या बालकास कृत्रिम श्वास देऊन जीवनदान देण्याचे काम केले आहे. लहाण बालकांना फिट्सचे आजार, मेंदुज्वर, इंचु दह अशा अनेक अवघड परिस्थितीत असणा­या बालकांवर योग्य निदान व उपचार करुन बालकासहीत अनेक माता – पित्यांच्या चेह­यावर स्मित हास्य आनले आहे.
                     डॉ. सौ. आरती कैलास चांडोळकर ह्या तर या डोंगराळ भागातील महिलांसाठी एक वरदानच ठरल्या म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही. कारण अनेक अवघड प्रसुती त्यांनी मुखेडमध्ये केल्या असुन त्यात साडेचार किलो वजानाच्या बाळाची प्रसुती तर अत्यंत साधेपणाने सीजर न होता केली व जुळे मुलांची प्रसुती सुध्दा सीजर न होता मातेला व बाळाला कोणताच त्रास न होता केली आहे. अवघड प्रमुती दरम्यान अनेक महिलांना नांदेड येथे घेऊन जावे लागत असे पण डॉ. सौ. आरती चांडोळकर या आहेत ना ! असे तालुक्यातील नागरीक सुध्दा म्हणत असतात. तर औरंगाबाद , नांदेड येथे तालुक्यातील अनेक महिला वंधत्व आल्यामुळे उपचारासाठी जात असतात पण त्या सुविधा सुध्दा त्यांनी मुखेड येथे देऊन माता – पिता होण्याचे स्वप्न असणा­या अनेक जोडप्यांचा जीवनात जगण्याची नवी उमेद त्यांनी निर्माण केली त्यामुळे तालुक्यातीलच नव्हे तर तालुक्याच्या आजुबाजुच्या परिसरातील रुग्णांना याचा मोठा फायदा झालेला आहे. 

               डॉ. कैलास पाटील चांडोळकर व डॉ. सौ. आरती कैलास चांडोळकर या डॉक्टर दांम्पत्यसांनी मुखेड तालुक्यात गंभीर दुष्काळ असताना अनेक रुग्णांची मोफत रुग्णसेवा केली आहे तर अनेकांना अत्यंत माफक दरात सुध्दा रुग्णसेवा देण्याचे काम त्यांच्या हातून घडले असल्यामुळे ही बाब अत्यंत गौरवास्पद सुध्दा आहे. अनेक रुग्ण यांच्याकडे येत असतात रुग्णांनी “साहेब पैसे नाहीत ” म्हटल्यावर अत्यंत स्मित हास्याने उत्तर देतात “राहु दया नंतर कधी बघु आपले बाळ छान आहे ना, काही अडचण आल्यास मला फोन करा ” असे ज्यावेळी रुग्ण उत्तर ऐकतो त्यावेळेस भावूक होऊन जातो. त्यामुळे अनेकांना स्व.भारत पाटील चांडोळकर यांची व त्यांच्या दिलेल्या संस्काराची आठवण होते. स्व. भारत पाटील चांडोळकर हे भाजपाचे एकनिष्ठ होते तर तालुक्यात भाजपा तळागळापर्यंत पोहचविणाऱ्यापैकी एक होते ते संघाचे एकनिष्ठ स्वंयसेवक सुध्दा असल्यामुळे त्यांच्या कामात शिस्त सुध्दा होती.
                   सर्व रुग्णांच्या, वैद्यकिय क्षेत्रातील जेष्ठ मार्गदर्शनाने, सहकार्याने, समाजातील विविध घटकातील नागरीकांच्या व तुमच्या सर्वांच्या पाठबळाने व आशीर्वादाने मुखेड सारख्या ग्रामीण भागात सुसज्ज इमारतीसह “अधिराज बालरुग्णालय व प्रसुतिगृह ” कोर्टासमोर , मोढा रोड , मुखेड येथे उद्घाटन होत आहे. यात एक्सरे, ऑपरेशन थेटर, लहाण मुलांसाठी काचेचे पेटी, सोनोग्राफी, लहाण बालकांचे अतिदक्षता विभाग या अनेक सुविधा यामध्ये अद्यावत केल्या आहेत. मुखेड तालुक्यातील प्रत्येक नागरीकांच्या आरोग्याची काळजी घेणे हेच या डॉक्टर दांम्पत्याचे कर्तव्य असुन अत्यंत माफक दरात गोर गरीबांना परवडेल अशा स्थितीत हे रुग्णालय सर्वांच्या सेवेसाठी खुले झाले आहे. आणि हो डॉ. श्री कैलास चांडोळकर व सौ. आरती कैलास चांडोळकर यांच्याकडे रुग्ण आला म्हणजे बरा होतोच ही जी भावना व आत्मविश्वास मुखेडकरांमध्ये आहे तेच यांचे जणु आजपर्यंत काम केलेले फळ आहे असे म्हणावे लागेल.

                  रडताना आलो जरी मी, हसत जाईन येथून मी,
           डॉ. चांडोळकर यांच्या रुग्णसेवेने आनंदी जगणे जगेन मी….!

                                                                           लेखक – ज्ञानेश्वर डोईजड मुखेड – 7875782377