मुखेड पोलिस स्टेशनच्या कर्मचा­ऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड / ज्ञानेश्वर डोईजड
          मुखेड पोलिस स्टेशन मधील कर्मचारी अंकुश संग्राम केंद्रे वय 52 रा. मुखेड (पोलिस वसाहत ) यांनी दि. 07 रोजी दुपारी 2 च्या सुमारास राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
             सविस्तर वृत्त असे की, अंकुश संग्राम केंद्रे हे मुखेड पोलिस स्टेशन मध्ये चालक या पदावर काम करत असत त्यांचा संपुर्ण परिवार महालक्ष्मीच्या सना निमित्त त्यांच्या मुळ गावी गेले असता मयत अंकुश केंद्रे हे घरी एकटेच होते. त्यांचा मुलगा सुरज केंद्रे वय 23 वर्ष यांनी 
त्यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला असता मयत अंकुश केंद्रे यांनी त्यास प्रतिसाद दिला नाही.                 त्यामुळे त्यांचा मुलगा व त्यांची पत्नी त्यांच्या मुळ गावाहुन मुखेडकडे दि. 07 रोजी दुपारी 1.50 च्या सुमारास आले व दार ढोढावले दार उघडत नसल्याने मुलाने दार जोरात ढकलले असता पोलिस कर्मचारी अंकुश संग्राम केंद्रे हे दोरीने गळफास घेतल्याचे आढळुन आले.

          तर त्यांच्या मुलाने त्यांना सकाळी 10: 30 च्या सुमारास फोन केला असता ते डयुटीवर जाणार असे म्हणाले असल्याची माहिती आहे. वृत्त लिहीपर्यंत आलेल्या माहितीनुसार गुन्हा दाखल होण्याची प्रकिया चालु होती तर आत्महत्येचे कारण अद्याप समजले नाही.