गणितातील मूळ संकल्पना आजच्या पिढीने समजून घेणे गरजेचे- प्रा. डॉ. संजय कल्याणकर

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड / ज्ञानेश्वर डोईजड
          गणित हा विषय वैदिक काळापासून भारतात आवडीने अभ्यासला जाणारा विषय आहे. माणसाची बौद्धिक प्रगल्भता विकसित करणाऱ्या गणित विषयाच्या मूळ संकल्पना आजच्या पिढीने समजून घेणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन शाहीर आण्णाभाऊ साठे महाविद्यालयाचे गणित विभागाचे प्रा. डॉ. संजय कल्याणकर यांनी ग्रामीण महाविद्यालय वसंतनगर ता. मुखेड जि. नांदेड येथे गणित अभ्यास मंडळ उद्घाटन व अतिथी व्याख्यान प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना केले.
  कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिदास राठोड यांनी केला. यावेळी माजी प्राचार्य डॉ. देविदास केंद्रे यांनी समयोचित मार्गदर्शन केले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणित विभागाचे प्रमुख प्रा. डॉ.संभाजी झंपलवाड यांनी करून कार्यक्रम आयोजना पाठी मागची भुमिका विशद केली.
  कार्यक्रमाच्या सुरुवातीला रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्याचबरोबर या शैक्षणिक वर्षातील गणित अभ्यास मंडळाचे उद्घाटन फीत कापून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.नूतन पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

     कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गणित विभागाचे प्रा. डॉ. परशुराम शिंदे यांनी केले तर आभार कु. शिवकन्या कागणे हिने मानले.  कार्यक्रमास रसायनशास्त्र विभागाचे प्रा.देविदास पवार, गणित विभागाचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.