मुखेड शहरात गणेशोत्सव व मोहरमच्या पार्श्वभूमिवर  पोलिसांचे पथसंचलन

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
 मुखेड / ज्ञानेश्वर डोईजड

गणेशोत्सव व मोहरमच्या  पार्श्वभूमिवर तालुक्यात कायदा व सुव्यवस्था व्यवस्थीत राहण्यासाठी मुखेड पोलिस निरीक्षक नरसिंग आकुसकर यांच्या मार्गदर्शनाखाली ढोल ताशांच्या गजरात शहरातील मुख्य रस्त्यावरुन पोलिसांचे पथसंचलन दि. 05 सप्टेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता काढयात आले.
या पथसंचलनात  मुखेड पोलिस निरीक्षक नरसिंग आकुसकर, पोलिस उपनिरीक्षक गजानन काळे, 30 पोलिस कर्मचारी , 11 दंगल नियंत्रण पोलीस (आरसीपी) , 5 ट्रेनिंग पोलीस व 33 होमगार्ड असा असे एकुण 81 पोलिसांचे मोठे पथसंचलन ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आले. सदर पथसंचलन गणेश विसर्जनाच्या मार्गावरुन काढण्यात आले.