शिवसेना उपजिल्हा प्रमुख पदी माजी उपनगराध्यक्ष संजय बेळीकर यांची निवड

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड / ज्ञानेश्वर डोईजड

         शिवसेना उपजिल्हा प्रमुख पदी माजी उपनगराध्यक्ष तथा सर्वसामान्य शिवसैनिक संजय बेळीकर यांची निवड झाली असून या निवडीबद्दल अनेक संघटनेच्यावतीने व शिवसैनिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
               शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार नांदेड जिल्ह्याचे शिवसेना संपर्कप्रमुख आनंद जाधव व शिवसेना जिल्हा प्रमुख ऊमेश मुंढे यानी मुखेड मतदार संघाचे शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते माजी उपनगराध्यक्ष संजय बेळीकर यांची शिवसेना उपजिल्हा प्रमुख पदी निवड केली संजय बेळीकर या सर्वसामान्य शिवसैनिकाला उद्धव ठाकरे यांनी न्याय दिल्याचे समजतात सर्व स्तरातून बेळीकर यांचे कौतुक होत आहे .

               संजय बेळीकर यांची उपजिल्हा प्रमुख पदी निवड झाल्याबद्दल मुखेड तालुका व शहर शिवसेना शाखेच्या वतीने सर्व सामाजिक संघटना, विविध राजकीय पक्षाच्या वतीने संजय बेळीकर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मुखेड विधानसभा संपर्क प्रमुख दयानंद शिंदे, शिवसेना जिल्हा संघटक व्यंकट लोहबंदे, विधानसभा प्रमुख शंकर पाटील लुटे, तालुकाप्रमुख बालाजी पाटील कबनूर कर, शहर प्रमुख नागनाथ लोखंडे,, उपतालुका प्रमुख शरद कोडगिरे,, गंगाधर पिटलेवाड, माजी नगरसेवक शंकरांना पोद्दार, डॉक्टर अतुल देबडवार,, सुनील मुक्कावार,, पवन पोद्दार, काँग्रेसचे दिलीप सावकार कोडगिरे, शिवकुमार बंडे ,सुशील पत्की, सतीश डाकुरवार ,गजानन पत्की आदींनी त्यांचा सत्कार केला.