मुखेड पंचायत समितीचा कारभार चालतोय रामभरोसे… 

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुुुक्रमाबाद : दत्ता पाटील माळेगावे 
     मुखेड पंचायत समितीमध्ये भोंगळ कारभाराने कळस गाठला असून अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक मंडळीनी चीरीमीरी घेतल्या शिवाय सर्वसामान्याचे कामे करीत नसल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना आर्थिक हाल पोहचत असून नागरिकांची कामे होत नसल्याने नागरिकातून संताप व्यक्त होत आहे पंचायत समिती प्रशासनाने सुरळीत कामे नाही केल्यास दिनांक १६ सप्टेंबर  रोजी पंचायत समिती कार्यालयाला ठोकण्याचा इशार नागनाथ बरले यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
      या लेखी निवेदनात नागनाथ बरले यांनी आरोप केला की मौजे देवगाव येथील पाण्याची पातळी मध्ये दोन महिन्यापासून वाढ झाली असताना भवनमध्ये विद्युत मोटार पाईप लाईन करून असा उपाययोजना करण्यासाठी ग्रामपंचायत नाही ठराव दिला होता मात्र प्रशासनाने त्या बाबीकडे दुर्लक्ष केल्याने भरपावसात मौजे देगाव मध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे तरीही प्रशासन चालढकल करीत आहे.
      मुखेड तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीमध्ये नियमबाह्य कामे होत आहेत चौदावा वित्त आयोगातील कामे जीआर प्रमाणे होत नाहीत पंतप्रधान आवास योजनेमध्ये बोगस मंडळीचे नावे यादीत समाविष्ट  करून खरे लाभार्थी वंचित ठेवले आहेत. याची चौकशी करा.केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालयाच्या कामे न करताच सरपंच व ग्रामसेवक संगनमताने परस्पर रक्कम हडप करीत आहेत. याची सखोल चौकशी करा तालुक्यातील ग्रामपंचायत अंतर्गत ग्रामसेवक जाणून-बुजून ग्रामसभा, मासिक सभा घेत नाहीत व शासनाच्या कोणत्याही योजनेची माहिती नागरिकांना देत नाहीत सर्व ग्रामपंचायत  कार्यालयाला ग्रामसेवक दोन- दोन महिने दांडी मारतात याची कुठेही नोंद प्रशासनाकडे नाही. त्यामुळे प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन चौकशी केली पाहिजे स्वच्छालय योजनेअंतर्गत एकाच घरातील बायको व नव-यांचे नांवे समाविष्ट करून शासनाला करोडो रुपयांना चुना लावीत आहेत.  चुकीच्या पद्धतीने नमुना नंबर आठ लावून नागरीकांची ग्रामसेव कमंडळी प्रचंड आर्थिक लूट करीत आहेत, ग्रामपंचायत विकास कामात अधिकाऱ्यांची टक्केवारी ठरलेले असून कोणत्याही योजनेत चिरीमिरी घेतल्याशिवाय स्वाक्षरी होत नाही त्यामुळे विकासकामांना खीळ बसून सरपंच मंडळींना भुर्दंड बसत असून या सर्वच कामाची सखोल चौकशी करून व गैरव्यवहाराची चौकशी करावी या मागणीसाठी दिनांक १६ सप्टेंबर रोजी पंचायत समिती कार्यालयास कुलूप ठोकण्याचा इशारा नागनाथ बरले यांनी दिला आहे.