मतदारसंघात घराणेशाही नको लोकशाही पध्दतीने विधानसभेच्या  तिकीटासाठी पक्षाकडे मागणी –  पंजाबराव वडजे

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

विद्यमान आमदारांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडल्याचाही केला आरोप

मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड
             भाजपा पक्ष हा लोकशाही पध्दतीने चालणारा पक्ष असुन या पक्षात सामान्य कार्यकर्ता सुध्दा आमदार बनु शकतो पण मुखेड – कंधार मतदार संघात घराणेशाही वाढत असुन ही वाढत चाललेली घराणेशाही मोडीत निघावी व  लोकशाही पध्दतीने सामान्य कार्यकर्त्यालाही तिकीट मिळावे यासाठी मुखेड – कंधार मतदार संघातून विधानसभेच्या तिकीटासाठी पक्षाकडे मागणी केली असल्याचे भाजपा आघाडी किसान मोर्चाचे नेते पंजाबराव वडजे यांनी दि. 04 रोजी मुखेड येथील शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले.
          मागील दहा वर्षापासुन भारतीय जनता पार्टी मध्ये काम करत असुन किसान मोर्चाच्या माध्यमातून शेतक­ऱ्याविषयी अनेक प्रश्न मार्गी लावले पण मागील काळात पंचायत समितीच्या निवडणूकासाठी पक्षाकडे मागणी केली असता भाजपाचे विद्यमान आमदार डॉ. तुषार राठोड यांनी मला उमेदवारी देऊ नये यासाठी मोठा आटापिटा केलाा पण पक्षाने माझी बाजु घेत मला उमेदवारी दिली व विजयी सुध्दा झालो निवडूण आल्यानंतरही विद्यमान आमदारांनी माझ्यासहीत अनेक कार्यकर्त्यांना सुध्दा वाऱ्यावर सोडल्याचा आरोप सुध्दा पंजाबराव वडजे यांनी यावेळी केला.
               चार ते पाच दिवसाखाली मुखेड शहरात माझ्यासहीत भाजपाच्या अनेक मान्यवर पदाधिकारी व  कार्यकर्त्यांनी भाजपाचे कार्यालय खोलले पण विद्यमान आमदारांनी याबाबत लहाण सहाण कार्यकर्त्यांनी कार्यालय खोलले आहे त्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नसल्याचे म्हणणे चुकीचे आहे याचा परिणाम त्यांना नगर परिषदच्या  निवडणूकीमध्ये भोगावा लागला असल्याचेही म्हणाले.

             पक्षाकडे लोकशाही पध्दतीच्या मार्गाने कोणीही उमेदवारी मागू शकते त्यामुळे मी ही भाजपाकडे उमदेवारी मागीतली आहे. मतदार संघात सर्व ताकतनीशी उतररुन विजयश्री खेचुन आणू असे यावेळी पंजाबराव वडजे म्हणाले. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांसह पत्रकार बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.