बेळकोणी येथील राशन दुकानदाराचा मनमानी कारभार.. गावकऱ्यांंनी केली तहसीलदारकडे तक्रार

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
पवन जगडमवार
         बिलोली- नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील मौजे बेळकोणी येथील राशन दुकानदाराचा मनमानी कारभार चालू असलेल्याचे गावातील नागरिकांना लक्षात येताच संतप्त झालेल्या गावकर्यांनी राशन दुकानदार सय्यद युसुफ याला चांगले च धारेवर धरले होते त्यावेळी राशन दुकानदार सय्यद युसुफ यांच्या कडे राशन ची पावती का देत नाहीत बॉयोम्रेट्रीक मशीन नुसार धान्य का देत नाहीस मशीन वर निघालेल्या पावती पेक्षा अधिक पैसे का घेता असे चौकशी केली असता राशन दुकानदार सय्यद युसुफ यांनी उडावा उडवी ची उत्तरे देत मला खर्च जास्त येतो त्यामुळे मी पैसे जास्त घेतो तुला जे करायचे आहे ते कर अशा पद्धतीने ग्राहकांना आरेरावेची भाषा केली संतप्त जमावाने राशन दुकानाचे शेटर बंद करून दुकान बंद केले व बिलोली चे नायब तहसिलदार गोन्ड यांच्या कडे निवेदन दिले मौजे बेळकोणी येथील राशन दुकानदाराची चौकशी करून राशन दुकानदारावर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी  तंटामुक्तीचे अध्यक्ष बळीराम मुजनकर, राजेन्द्र डाकेवाड, आनंद मचंलवाड, शंकर शिंगरवाड यांच्या सह गावकर्यांनी केली होती याबाबत सविस्तर माहिती आमचे लोकभारत न्युज चे प्रतिनिधी पवन जगडमवार यांनी घेतले 
लाभार्थी प्रतेकी कुटूंबांना चार ते पाच किलो राशन देत असे कमी 
बायोमेट्रिक मशीन असताना सुध्दा नांदेड जिल्ह्यात अाणखी राशनचा काळा बाजार चालूच
राशन दुकानदार राशनची पावतीच देत नसे 
राशनच्या किंमती पेक्षा जास्त पैसे घेऊन राशन वाटप करत असे 
प्रतेक ग्राहकाकडून केली जात असे लुट 
ग्राहकांनी केली नायब तहसिलदार गोन्ड कडे तक्रारी निवेदन
राशन दुकानदाराची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी