संगणक परिचालकाचे मुखेडात विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड / ज्ञानेश्वर डोईजड 

             मुखेड तालुक्यातील सर्व संगणक परिचारिकांनी मुखेड पंचायत समिती कार्यालयासमोर दि २८ रोजी एक दिवसीय धरणे करण्यात आले आहे . 

 
      आपले सरकार सेवा केंद्र या प्रकल्पात राज्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समिती,व जिल्हा परिषद स्तरावर संगणक परिचालक म्हणुन हजारो संगणक परिचालक हे डीजीटल महाराष्ट्राचे काम करत आहेत तरी त्या बदल्यात त्यांना फक्त सहा हजार रुपये मिळतात तेही वेळेवर मिळत नाहीत म्हणून आज महाराष्ट्रातील संगणक परिचारिकांच्या वर उपासमारीची वेळ आली त्यामुळे मुखेड तालुक्यातील सर्व संगणक परिचारिकांनी एक दिवसीय धरणे आंदोलन केले. 
         यामध्ये  राज्यातील सर्व ग्रामपंचायत संगणक परिचारिकांना महाराष्ट्र आय.टी. महामंडळ कडुन संगणक परिचालक म्हणुन कायम स्वरुपी नियुक्ती देणे, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर संगणक परिचालकांना नियुक्ती देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून त्याचा शासन निर्णय काढून त्यांना महाराष्ट्र आय.टी. महामंडाळाकडुन नियुक्ती द्यावी, सर्व संगणक परिचारिकांचे मानधन १४ व्या वित्त आयोगातुन न देता राज्य शासनाच्या निधीतून प्रती महिना किमान वेतन १५००० हजार रुपये द्यावे, सर्व संगणक परिचालकांचे मागील एप्रिल २०१७ते जुलै २०१९ पर्यंतचे सर्व थकीत मानधन द्यावे, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे मानधन द्यावेअसे अनेक मागण्या घेऊन मुखेड पंचायत समिती कार्यालया समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले . 
           यावेळी संघटनेचे मुखेड तालुका अध्यक्ष राजेंद्रकुमार अडबलवार, सचिव दत्तात्रय सचिव दत्तात्रय अटकळे, चक्रधर कारळे, शंकर वानोळे, मारोती गवलवाड, गणेश कानडे, संदिप गवते, माराती आगदे, प्रकाश गरुडकर, सुधाकर गोपनर, कल्याण पाटील, दत्तात्रय शेकापुरे, राजेश ईबितदार, प्रकाश गायकवाड, गणेश अम्रतवार यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.  संगणक परिचारिकांच्या मागण्या मान्य करावे व या आंदोलनाची दखल शासनाने घ्यावी अन्यथा यापुढे वेगवेगळ्या प्रकारचे तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ही यावेळी देण्यात आला.