विद्यापीठ जलतरण स्पर्धेत ग्रामीण महाविद्यालयाचे  दहा पदकाची कमाई 

नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड /प्रतिनिधी
              स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व संत जनाबाई महाविद्यालय गंगाखेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या आंतरमहाविद्यालयीन जलतरण स्पर्धेत विद्यापीठातून मुखेड तालुक्यातिल ग्रामिण कला ,वाणिज्य विज्ञाण महाविद्यालय  वसंतनगर, येथिल   खेळाडूंनी दहा पदकांची रग्गड कमाई करुन विद्यापीठात आपला दबदबा कायम ठेवला  या मुळे काॅलेजच्या वतिने  विजयी खेळांडुंचा  सत्कार करण्यात आला.
        या स्पर्धेत  शिवाजी वैजनाथ केंद्रे यांनी ४०० मीटर आय .ॲम. या स्पर्धेत गोल्ड मेडल प्राप्त केले. तसेच गणेश केंद्रे या खेळाडूंनी २०० मीटर बॅकस्ट्रोक या स्पर्धेत गोल्ड मेडल प्राप्त केले. तसेच  गणेश प्रल्हाद केंद्रे यांनी २०० मीटर आय ॲम स्पर्धेत गोल्ड मेडल, १०० मीटर बेस्ट स्टॉक ब्राँझ मेडल ,आणि ५० मीटर बटरफ्लाय स्पर्धेत ब्राँझपदक ,आणि  शिवाजी नागरगोजे यांनी २००  आय  एम मध्ये सिल्वर मेडल ,आणि बाबासाहेब केंद्रे या खेळाडूंनी तीन पदके प्राप्त केले. त्यात १०० मीटर बेस्ट स्टोक, सिल्वर मेडल १०० मीटर ब्क स्टॉक, सिल्वर मेडल १०० मीटर फ्री स्टाइल मध्ये ब्राँझपदक प्राप्त केले.  स्पर्धेत पदक प्राप्त केलेल्या खेळाडूंचे सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरिदास राठोड यांनी केले.खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे विमुक्त जाती सेवा समिती चे संस्थापक अध्यक्ष माननीय कर्मवीर किशनरावजी राठोड,सचिव गंगाधर रावजी राठोड माननीय आमदार तुषारजी राठोड तसेच या खेळाडूला क्रीडा संचालक प्रा. सुभाष  देठे यांचे मार्गदर्शन लाभले   .
       तर  महाविद्यालयातील  प्रा.सिनेट सदस्य प्रा. डॉ.  एस.एम रेड्डी, माजी प्राचार्य देविदास केंद्रे ,प्रा.बी.सी. राठोड, सल्लागार समितीचे सदस्य प्रा. डॉ. महेश पेंटेंवार प्रा. डॉ. कविता लोहाळे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.