ज्ञानेश्वर रातोळीकर यांना आदर्श तलाठी पुरस्काराने सन्मानित..मुक्रमाबाद तलाठी कार्यालय केले होते डिजिटल 

नांदेड जिल्हा मुखेड
  मुखेड / ज्ञानेश्वर डोईजड 
      पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषेदेच्या वतीने रविवारी कुसूम सभागृह नांदेड येथे घेण्यात आलेल्या शेतकरी मार्गदर्शन मेळाव्यास शेतकऱ्यातून प्रतिसाद,यावेळी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत शेती व शेतीसंबंधीत कामात उल्लेखनीय कार्य करणारे मुक्रमाबाद येथील तलाठी ज्ञानेश्वर रातोळीकर यांना आर्दश तलाठी पुरस्कार देऊन  गौरव करण्यात आला.याबरोबर पञकार दत्ता पाटील माळेगावे यांना उत्कृष्ट पञकार पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
      यावेळी शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील,जिल्हा परिषद अध्यक्ष शांताबाई जवळगावकर,मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे कुलगुरु डॉ.अशोक ढवण,जिल्हा कृषी अधिकारी रविशंकर चलवदे,शिवराज पा.होटाळकर,कृषी परिषेदेचे जिल्हाध्यक्ष रामदास पा.माळेगावे यांची प्रमुख उपस्थिती होती.पांरपारिक शेतीत बद्दल करुण,आधुनिक तंत्रज्ञान पद्धतीने शेतकऱ्यांना शेती करता यावी या उद्देशाने जिल्हा कृषी परिषेदे वतीने शेतकरी मार्गदर्शन मेळावा व पुरस्कार वितरण सोहळयाचे आयोजन करण्यात आला होते यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता.
     यावेळी शेती निगडीत,शैक्षणिक,पञकार,कृषी केंद्र क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या मंडळीना प्रोत्साहनपर सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.मुक्रमाबाद येथील तलाठी ज्ञानेश्वर रातोळीकर यांचा सहपत्नी यांना पुरस्कार   देऊन गौरव करण्यात आला.तर पञकार दत्ता माळेगावे व्यापारी रुपेश वटृमवार यांना पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आल्या बदल तहसीलदार काशीनाथ पाटील,नायब तहसीलदार आर,आर.पद्मावार,रयत क्रांतीचे जिल्हा युवा अध्यक्ष शिवशकंर पाटील कलंबरकर,बालाजी पाटील,तलाठी मारोती श्रीरामे,कदम,पदाजी,शिवाजी तोतरे सह आदीने अभिनंदन केले आहे.