लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकरांनी केले मुखेडकरांना मंत्रमुग्ध, मुखेडकरांचा प्रचंड प्रतिसाद, हजारो प्रेक्षकांची उपस्थिती

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

  मुखेडकरांनी भरभरुन प्रेम दिले – सुरेखा पुणेकर

मुखेड  / ज्ञानेश्वर डोईजड

           महाराष्ट्राची कन्या तथा लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा शिवसंग्राम संघटनेच्या वतीने दहीहंडी महोत्सवानिमीत्त दि. 26 रोजी सायंकाळी 6 च्या जि.प.हा. मुलींचे मैदान , मुखेड येथे घेण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमास मुखेडरांनी प्रचंड असा प्रतिसाद देत त्यांच्या अनेक गाण्यांवर रसिकांनी ठेका धरला. 
           या कायक्रमाचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करुन व दहीहंडी फोडून हिंगोली येथील कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास भाजपा तालुकाध्यक्ष नामदेव पाटील जाहुरकर, भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष नाजीमपाशा सौदागर, शिवसंग्राम संघटनेचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील आडलुकर, युवक प्रदेशाध्यक्ष अविनाश खापे, जिल्हा संपर्क प्रमुख सुरजितकुमार ठाकुर, लोहा पंचायत समितीचे सभापती सतिष पाटील उमरीकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 

              यावेळी रामदास पाटील यांनी महाराष्ट्राच्या लोककलेचे आदर करण्यास सर्वांना सांगितले तर आपले भविष्य आपल्या हाती असुन स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातुन व अभ्यासाच्या जोरावर आपले यश संपादन करता येते त्यामुळे आपले आयुष्यातील वेळ इतरत्र वाया न घालवता समाजाची व या राष्ट्रासाठी समर्पित करावे असेही म्हणाले. 
          लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी मुखेडकरांनी महाराष्ट्राची लोककला असलेली विविध लावणी सादर केली. लावणीची सुरुवात गणरायाचे पुजन करुन करण्यात आले तर यामध्ये या रावजी बसा भावजी, जवा बघतीस तू मझ्याकड मला आमदार झाल्या सारखं वाटतंय, तुला मिरविन गाडीवर, नाकी डोळी छान रंग गोरा गोरा पान, पिकल्या पानाचा देठ की हिरवा , जोगवा , बाई वाडयावर या, नाद खुळा, मेनका उर्वशी अशा अनेक लावण्यांचा यात समावेश होता. या कार्यक्रमास जि.प.हा. मुलींचे मैदान खचाखच भरुन गेले होते तर मुखेडकरांनी या कार्यक्रमास भरुभरुन प्रतिसाद दिला.

                 हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसंग्राम संघटनेचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील आडलुरकर, कंधार तालुकाध्यक्ष  राजीव पाटील गायकवाड, मुखेडचे गणपत तंलगे पाटील, जिल्हा उपाध्यक्ष संदिप पाटील यरकलवार,  आकाश पाटील केरुरकर, कंधार शहराध्यक्ष सचिन पाटील जाधव यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास पोलिस निरीक्षक नरसिंग आकुसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक असद शेख,  व त्यांच्या पोलिस कर्मचा­यांनी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 
              या कार्यक्रमास तालुक्यातील पत्रकार बांधव , नागरीक, महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या. तर महिलांची उपस्थिती मोठया प्रमाणात असल्याने ती लक्षनीय दिसत होती.

मुखेडकरांनी भरभरुन प्रेम दिले – सुरेखा पुणेकर
मुखेडच्या रसिकांनी आमच्या लोककलेला मोठया प्रमाणात प्रतिसाद दिला. यामध्ये महिलांनी मोठया प्रमाणात आमच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली याचा मला अतिशय आनंद होत आहे. संयोजकांनी अतिशय उत्तमरित्या आयोजन केले. मुखेडकरांचे प्रेम कायम लक्षात राहिल.