दिल्ली येथे श्रीगुरु रविदास महाराज यांचे मंदिर पाडल्याचा मुखेडात निषेध

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड / ज्ञानेश्वर डोईजड

            दिल्ली येथे गुरु रविदास महाराज यांचे मंदिर पाडलेच्या  निषेर्धात दि. 21 रोजी मुखेड येथे चर्मकार समाज संघटनेच्या वतीने मुखेड तहसिलदार काशिनाथ पाटील यांना निवेदन देऊन निषेध मोर्चा काढण्यात आला. 
                चर्मकार समाजाचे आराध्य दैवत असलेले श्री गुरु  रविदास महाराज यांचे दिल्ली येथील तत्कालीन सम्राट सिकंदर लोधी यांनी बारा एकर जमीन दान दिली होती. सदर  मंदिर 600 वर्षापूर्वीचे जुने असुन श्री. गुरु  रविदास यांचे 600 वर्षापुर्वीचे पुरातन मंदीर दिल्ली सरकारने जमिनदोस्त केले याचा निषेध करत सदर जमीन चर्मकार समाजास परत देण्याची मागणी सुध्दा करण्यात आली. 
              यावेळी चर्मकार समाजाचे नेते संजय वाघमारे, दशरथ गोणारे, बालाजी कांबळे, , संजय सुर्यवंशी , राजु भालके,सुनिल कांबळे, मारोती कांबळे, श्रीकांत कांबळे, पांडुरंग कांबळे, हाणमंत जमदाडे, गणेश लष्करे, गोपिनाथ गंगासागरे, सतिष कांबळे यांच्यासह महिला, जेष्ठ नागरिक,लहान बालके व चर्मकार समाज बांधव उपस्थित होते.