मुखेडात कर्जाला कंटाळुन शेतक­ऱ्याची आत्महत्या  …. तीन दिवसात शेतकऱ्याची दुसरी आत्महत्या

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड  / ज्ञानेश्वर डोईजड

              मुखेड शहरापासुन जवळच असलेल्या होडगीरवाडी येथील  शेतकरी मनोहर मारोती हाके वय 50 वर्ष यांनी शेतातील नापीकी व झालेल्या कर्जाला कंटाळुन दि. 21 रोजी दुपारी 12 च्या सुमारास आपल्या मालकीच्या शेतात लिंबाच्या झाडास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. तर तालुक्यात मागील तीन दिवसात ही दुसरी आत्महत्या आहे.
               सविस्तर वृत्त असे की, मुखेड शहरातील अहिल्याबाई होळकर नगर येथे वास्तव्यास असलेले शेतकरी मनोहर मारोती हाक्के वय 50 वर्ष यांच्या नावे तीन एकर शेत असुन घराकडुन शेताकडे त्यांची म्हैस घेऊन मुखेड – बा­हाळी रोडकडे रुबी हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या शेतातकडे निघाले.आपल्या म्हैशीला चारा देऊन लिंबाच्या झाडाला म्हैशीस बांधुन त्याच लिंबाच्या झाडावर चढले असता यावेळी शेतातील निंदकाम करणा­या महिला त्यांना असे का बसलात म्हणुन विचारणा केली व महिला कामाला लागले हे पाहुन अचानक शेतकरी मनोहर हाक्के यांनी आपल्या जवळची नायलन दोरी झाडाला बांधुन गळयात ओढुन गळफास घेऊन आत्महत्या केली. 
             ही बाब मुखेड पोलिस स्टेशनला कळताच घटनास्थळी पंचनामा केला व पोलिस निरीक्षक नरसिंग आकुसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नायक चंदर आंबेवार व योगेश महिंद्रकर तपास करीत आहेत. फिर्यादी अॅड नामदेव हाक्के यांच्या फिर्यादीवरुन मुखेड पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करुन कलम 174 सी आर पी सी प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 
                मयत मनोहर हाक्के यांच्या पश्चात दोन पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असे परिवार असुन त्यांच्या अश जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त असुन कुटूंबावर मात्र उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने तात्काळ सहकार्य करण्याची मागणी नातेवाईकाकडुन होत आहे.


              तालुका सतत मागील चार वर्षापासुन दुष्काळाच्या छायेत असुन याचा मोठा परिणाम तालुक्यातील शेतक­ऱ्यावर पडला असुन यामुळे शेतकरी मोठया आर्थिक विवंचनेत सापडला आहे. महाराष्ट्रात सर्वदुर पाऊस असला तरी मराठवाडयात मात्र पावसाने पाठी फिरवली आहे.