एस एफ आय ने देगलूर बस स्थानकावर बसेस अडवुन केले दोन तास ठिय्या आंदोलन

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

देगलूर / पवन जगडमवार

         देगलूर हे तालुक्याचे ठिकाण मोठ्या बाजारपेठ चे शहर आहे तसेच शाळा, कॉलेज, महाविद्यालय मोठ्या प्रमाणात असल्याने येथे दररोज विद्यार्थी व प्रवाशांची मोठी वर्दळ असते,

        देगलूर तालुक्यातील ग्रामीण भागातील असंख्य विद्यार्थी व विद्यार्थींनी शिक्षण घेण्यासाठी देगलूर या ठिकाणी येत असतात पन देगलूर बस आगार च्या ढसाळ कारभारामुळे या विद्यार्थ्यांना व प्रवाशांना नाहक त्रास सहन करावे लागत असे त्यामुळे विद्यार्थ्यांनचे मोठे नुकसान होत असे बस पास काढूनही बस वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेज, ला येण्यास उशिर होत असे वेळे अभावी विद्यार्थ्यांना खाजगी गाड्यांने प्रवास करावे लागत असे त्यामुळे बस पास असुनही विद्यार्थ्यांना पैसे देऊन प्रवास करावे लागत असे जर पैसे नसले तर विद्यार्थ्यांना तासनतास उपाशी थांबुन बस ची वाट पाहत बसावे लागायचे पन बस काही वेळेवर लागायचे नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक, मानसिक, शाररीक त्रास सहन करावे लागायचे त्यामुळे एस एफ आय या विद्यार्थी संघटनेच्या वतिने दि 13 ऑगस्ट रोजी देगलूर बस आगार प्रमुख यांना निवेदन देण्यात आले होते यावेळी निवेदनात काही प्रमुख मागण्या करण्यात आले होते की आंबुलगा, हसनाळ , मार्गे बाह्राळी जाणारी बस वेळेवर सोडावी, आलूर वरून येणारी सकाळची बस 9 वाजून 30 मी पर्यत नविन बस स्थानकावर पोहचली पाहिजे, तसेच सांगवी व शेगाव या दोन गावातुन येणाऱ्या विद्यार्थ्यांना जून्या बसस्थानकापंर्यत सोडवले पाहिजे,देगलूर बस आगारचे बस वेळेवर लागलेच पाहिजे या मागणीचे निवेदन देण्यात आले होते जर मागण्या मान्य नाही झाल्यास एस एफ आय च्या वतिने आपल्या कार्यालयावर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आले होते पन बस आगारच्या सबंधीत अधिकाय्रांने यावर कारवाई न केल्यामुळे एस एफ आय या विद्यार्थी संघटनेच्या वतिने दि 20 ऑगस्ट रोजी 12 वाजता देगलूर बस स्थानकावर तब्बल दोन तास ठिय्या व आक्रमक आंदोलन करण्यात आले. देगलूर बस स्थानका च्या दोन्ही बाजूच्या गेटला रास्ता रोको करून विद्यार्थ्यांनी गेट अडवले होते.

त्यामुळे दोन तास आगार कार्यालयातून एकही बस बाहेर जाऊ दिली नाही. सर्वच बसेस थांबवण्यात आले होते त्यामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली होती विद्यार्थ्यांनी दोन्ही बाजूच्या गेटवर आपला ताबा केले व साखळी करून विद्यार्थी थांबल्या मुळे बस चालकांना बस बाहेर नेता आले नाही, विद्यार्थ्यांनी सांगितले बस जर बाहेर घेऊन जायचे असेल तर आमच्या अंगावरून च घेऊन जावे लागेल पन आम्ही मागे हटणार नाही असे बजावून सांगितले होते, दोन्ही बाजूच्या गेट वर विद्यार्थी येऊन थांबल्या मुळे बस स्थानकाचे नाकच दाबल्या सारखे झाले त्यावेळी,समंधीत बस स्थानक प्रमुख यांचे होश ठिकाणावर आले.

विद्यार्थ्यांनी ही जोरदार घोषणाबाजी करून बस स्थानक कार्यलय हादूर सोडले होते बस आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची,आगार प्रमुख मुडदाबाद, सरकार हमको पढने दो देश को आगे बढने दो, देगलूर बस स्थानकाचे करायचे काय खाली मुडके वरी पाय अशा जोरदार घोषणा देण्यात आले त्यावेळी बस स्थानक प्रमुख गिलके यांनी आंदोलन कर्त्या विद्यार्थीनची भेट घेऊन निवेदन स्विकारले आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या मागण्या बस आगार प्रशासनाने मान्य केल्याचे लेखी पत्र दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.

हे आंदोलन स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया एस एफ आय देगलूर तालुका कमिटीने केले होते यावेळी एस आय देगलूर तालुका कमिटीचे अध्यक्ष सुर्यकांत बडूरे, उपाध्यक्ष अक्षय गायकवाड, सदस्य नर्सिंग सोनकाबळे, पवन जगडमवार, बालाजी तैदलवाड मदनुर ,अनिल पांचाळ, विठ्ठल दासरवाड, शुभम येवते ,संजय गायकवाड यांच्यासह असंख्य विद्यार्थी उपस्थित होते