रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी जखमी ….. मुखेड तालुक्यातील वळंंकी येथील प्रकार

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
बा-हाळी: पवन कँदरकुंठे
           मुखेड तालुक्यातील वळंकी मध्ये घडलेला हा प्रकार शेतकरी श्रीरंग गंगाराम बिरादार (वय ६२ वर्षे) 
यांनी रस्त्याच्या नालीच्या बाजुने  जनावरे चारत असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला या हल्ल्यामध्ये ते बचावले पण खुप रक्तस्त्राव झाला.श्रीरंग बिरादार यांनी स्वतः चा जीव वाचवण्यासाठी खुप प्रयत्न केले पण शेवटी रानडुक्कराने त्यांचा चावा घेतला व ते जमीनीवर कोसळले.मग वळंकी येथील गावातील काही युवक रस्त्यावरून जात असताना त्यांनी त्या शेतकऱ्यांना पाहिले व त्यांच्या मदतीसाठी पुढे आले.
           दि.१६ रोजी ठीक सायंकाळी ०४.३० वाजता हा प्रकार घडला व त्यांना तात्काळ सरकारी दवाखान्यात मुक्रमाबाद येथे हलविण्यात आले परंतु ५.३० वाजले असल्याने तेथील दवाखान्याला कुलुप लावलेले असल्याने तेथुन लगेच पुढे सावरमाळ येथील दवाखान्यात नेले असता तेथेही दवाखाण्याला कुलुप होते त्यामुळे त्या रूग्नांची खुप हेळसांड झाली व त्यांचा जीव नाकात आला. मुक्रमाबाद व सावरमाळ येथील दोन्ही सरकारी दवाखान्यांना कुलुप असल्यामुळे तेथुन त्यांना परत आणुन  समर्पन हाँस्पीटल मुक्रमाबाद येथील प्रायव्हेट दवाखान्यांमध्ये त्यांना दाखल करण्यात आले व डॉ.अंतेश्वर एस.सुवर्णकार यांनी त्यांचा ईलाज केला. शेतकरी श्रीरंग बिरादार यांचे चिरंजीव सचिन बिरादार यांनी
सविस्तर माहिती लोकभारत न्युजचे आमचे प्रतिनिधी पवन कँदरकुंठे यांना सविस्तर माहिती दिली.