नोकरी महोत्सवातून  मिळते बेरोजगारांना रोजगाराची संधी —-  खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड / ज्ञानेश्वर डोईजड
             मुखेड सारख्या डोंगरांनी दुष्काळी भागामध्ये नोकरी महोत्सवाचे आयोजन करून मतदारसंघातील तथा परिसरातील सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी उपलब्ध करून देण्याची संधी आ. डॉ. तुषार राठोड यांनी या महोत्सवाच्या माध्यमातून दिली हे कार्य अत्यंत अभिमानास्पद आणि कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले.
           माध्यमिक आश्रम शाळा कमळेवाडी च्या प्रांगणामध्ये युवा नेते जिल्हा परिषद सदस्य संतोष भाऊ राठोड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नोकरी महोत्सवाचे आयोजन आ. डॉ. तुषार राठोड यांच्या संकल्पने मधून करण्यात आले होते.   महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे होते, तर महोत्सवाचे उद्घाटन माजी आमदार तथा भाजपाचे प्रदेश चिटणीस अविनाश घाटे यांच्या हस्ते करण्यात आले.
      यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी आ. कर्मवीर किशनरावजी राठोड, जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन प्रवीण पाटील चिखलीकर, खुशाल पाटील उमरदरीकर, व्यंकटराव पाटील चांडोळकर, गंगाधरराव राठोड, नांदेड महापालिकेचे नगरसेवक संजय पाटील घोगरे आदी मान्यवर उपस्थित होते.
            यावेळी बोलताना खासदार प्रतापराव पाटील पुढे म्हणाले की आमदार तुषार राठोड खऱ्या अर्थाने हुशार राठोड आहेत त्यांनी अगदी अल्प काळामध्ये केंद्र व राज्य सरकारचा निधी खेचून आणून आपल्या मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलला आहे. राष्ट्रीय महामार्ग राज्य महामार्ग जिल्हा मार्ग इतर जिल्हा मार्ग जोड रस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आदींच्या माध्यमातून मुखेड मतदारसंघांमध्ये रस्त्यांचे जाळे विणले आहे . केवळ रस्त्यांची कामे झाली असे नाही तर विविध विकासाची कामे करत असताना या भागातील सुशिक्षित बेरोजगारांना  त्यांची ससेहोलपट टाळण्यासाठी मुखेड येथे रोजगार मेळावा आयोजित केला आहे. आज या मेळाव्यास अभुतपूर्व प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे.
       या मेळाव्यासाठी तीन हजार सुशिक्षित बेरोजगारांनी नोंदणी केली असून त्यापैकी सुमारे चौदाशे जणांना नियुक्तीपत्र देण्यात आल्याचे संयोजकांनी यावेळी सांगितले देशात नरेंद्रजी मोदी आणि राज्यांमध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार जोरदार काम करीत असून मुखेड मतदारसंघातही आ. डॉ.तुषार राठोड यांच्या नेतृत्वाखाली विविध विकासाची कामे पूर्ण होत असून सर्वसामान्य माणसाला विकासाच्या प्रक्रियेमध्ये सामावून घेतल्याचे चित्र पाहायला मिळते  आहे.
        माझ्या निवडणुकीतील विजयामध्ये मुखेडकर यांचा वाटा सिंहाचा असून, याचा विसर मी कदापिही पडू देणार नाही. माझ्या स्थानिक विकास निधीची स्वाक्षरी केलेली कोरी  पत्रे  आमदार डॉक्टर तुषार राठोड यांच्याकडे देत असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर सांगितले.
       यावेळी माजी आमदार अविनाश घाटे म्हणाले की मुखेड मतदारसंघांमध्ये आमदार तुषार राठोड साहेब यांनी विकास कामांच्या माध्यमातून परिवर्तन आणले आहे. आमच्या मधुकररावजी घाटे सहकारी सूतगिरणी साठी सुद्धा आमदार राठोड साहेबांनी मदत केली असून आगामी काळात या सूतगिरणी रोजगारांची गरज लागणार आहे.
      त्यावेळी आपण मतदारसंघातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. आमदार डॉक्टर तुषार राठोड यांचे काम अत्यंत समाधानकारक असून आगामी काळातही त्यांच्याच नेतृत्वाखाली मतदारसंघामध्ये विकास कामे पूर्ण होतील अशी आशा व्यक्त  केली.  कार्यक्रमाचे  प्रास्ताविक करताना आ.डॉ. तुषार राठोड म्हणाले  मतदार संघ पूर्ण डोंगराळ भागाने वेढलेला असून भौगोलिक परिस्थितीमुळे या भागात सिंचनाचा अभाव आहे. या भागातील  अल्पशिक्षित व उच्चशिक्षित सुशिक्षित बेरोजगारांना  पुणे, मुंबई, औरंगाबाद सारख्या ठिकाणी जाऊन  कार्यालयाचे खेटे मारणे  आर्थिक बाजूने  जड असल्याने,  या बेरोजगारांना  मुखेड आताच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी  या नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार कर्मवीर किसन राठोड यांनी आपले विचार व्यक्त केले मोठ्या माणसाला सत्तेतून दूर करून प्रतापराव या सर्वसामान्य माणसाने आपल्याला खासदार केले याकडे आपलं विशेष लक्ष असू द्यावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
      यावेळी नोकरी महोत्सवाचे समन्वयक चंद्रकांत जाधव पुणे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. आजच्या महोत्सवातून एक हजार तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिल्याशिवाय येथून  जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. आजच्या या नोकरी महोत्सवास अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याचे उपस्थितांच्या गर्दीवरून दिसून आले. सुमारे तीन हजार बेरोजगार तरुणांनी नोंदणी केली होती. त्यापैकी एकाच दिवसात सुमारे चौदाशे जणांना विविध कंपन्यांमध्ये नियुक्तीपत्र देण्यात आल्याचे चंद्रकांत जाधव यांनी यावेळी सांगितले. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तीन बेरोजगारांना खासदार आणि आमदार महोदयांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी वाढदिवस मूर्ती भाजपाचे युवा नेते  ये  तथा जिल्हा परिषद सदस्य संतोष भाऊ राठोड  यांचा ३९वा  वाढदिवसाच्या कार्यक्रमास चंद्रशेखर देशमुख, लक्ष्मण पाटील, राजू घोडके, बालाजी पाटील शिंदे, गोटू पाटील बिल्लाळीकर, माजी नगराध्यक्ष गणपतराव गायकवाड, नगर परिषदेतील गटनेते चंद्रकांत गरुडकर, अनिल शेठ,  जगदीश बिर्याणी, राजू पाटील बामणे, गोविंद घोगरे, उत्तमराव बनसोडे, विजय किन्हाळकर, उद्धव पाटील उमाटे, बालाजी पाटील जांभळीकर ,दत्ता पाटील बेटमोगरेकर, बालाजी बलशेठवार, किशन आमदापुर,  हेमंत खंकरे, शिवाजी राठोड, किशोरसिंह चौहाण, अमर ठाकूर, संगमेश्वर देवकते, नारायणराव चमकुरे, गजानन साखरे, मनोज भाऊ गोंड, राम पाटील गायकवाड, जे.बी.कांबळे, नागनाथ कोटीवाले, गोविंदराव केंद्रे, व्यंकटराव गायकवाड, कळकेकर,दत्ता पाटील लिंगापुरकर आदीसह मतदारसंघातील भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते सुशिक्षित बेरोजगार मोठ्या संख्येने उपस्थित होते या महोत्सवामध्ये मुंबई, पुणे,औरंगाबाद येथील नामांकित अशा २९कंपन्यांनी आपली उपस्थिती लावली होती. प्रथमच ग्रामीण भागामध्ये नोकरी महोत्सवाचे आयोजन केल्याने ग्रामीण भागातील बेरोजगारांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंत बोडके यांनी केले तर आभार प्रदर्शन किशोरसिंह चौहाण यांनी केले.