राजूरा कॉलेज ला स्वातंत्र्य दिनानिमित्त चिमणझेप या भित्तीपत्रकाचे प्रकाशन कौतुकास्पद – श्रीराम पाटील राजूरकर

नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड / पवन जगडमवार

       मुखेड तालुक्यातील मौजे राजूर येथिल क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सकाळी 8 वाजता संस्थेचे अध्यक्ष श्रीरामजी पाटील राजूरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व चिमण झेप या भित्तीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले तसेच दहावी वर्गातून सर्वाधिक गुण मिळवून शाळेतून प्रथम येणारी विद्यार्थीनी वैष्णवी बाबूराव ठाणेकर, द्वितीय अनुजा दिनकरराव जाधव व तसेच बारावी विज्ञान शाखेतून कॉलेज मधुन प्रथम येण्याचा मान मिळवणारा विद्यार्थी कदम अजिंक्य अंतेश्वर, द्वितीय दिव्या मधुकर पाटील, तर बारावी कला शाखेतून कॉलेज मधुन प्रथम येण्यारी विद्यार्थीनी आंबुलगा येथील कुमारी राजेश्री अशोक पोगुलवाड, द्वितीय निराधार सिमा मनोज या गुणवंत विद्यार्थ्यांनचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आले

यावेळी पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आपल्या लेखणीतून अन्यायाविरोधात लिखाण करून समाजासमोर मांडणारे निर्भिड पत्रकार म्हणून ज्यांची ओळख आहे असे राजूर कॉलेज चे माझी विद्यार्थी पत्रकार पवन जगडमवार यांचा व पत्रकार पांडूरंग पुठ्ठेवाड यांचा राजूर कॉलेज च्या वतीने शाल व श्रीफळ देऊन विशेष सत्कार करण्यात आले,

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आयनेले सर, तलाठी मुंडे साहेब, डॉ झरीकर, विलास पाटील, संदिप, पाटील पुंडलिक जंगमवाड, मारोतीराव साधू पाटील, सोपानराव पाटील हे उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते क्रीडास्पर्धेचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले यावेळी प्रास्ताविकात शाळेचे प्राचार्य व्ही बी रानशेवार सर यांनी विद्यालयाच्या यक्षाचा चढता आलेख मांडले, तर अध्यक्षीय समारोपात संस्थेचे अध्यक्ष श्रीरामजी पाटील राजूरकर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांनचे व त्यांच्या पालकांचे तसेच त्यांना ज्ञान देणाय्रा शिक्षकांचे कौतुक केले तसेच चिमण झेप भित्तीपत्रकाचे प्रकाशन हे कौतुकास्पद असल्याचे सांगितले व सर्व विद्यार्थ्यांना, नागरिकांना व शिक्षकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर टी नवेकर यांनी केले तर आभार बी एस झरे यांनी मांडले,

यावेळी हिवराळेसर, पाटील एच एन, पाटील एम बी, वाघमारे, कदम, काळे, गव्हाणे, श्रीमंले, स्वामी, एन आर पोटफोडे, गजले, ग्रंथपाल आनंदराव जंगमवाड सर, डोपेवार, पोटफोडे, सगर मॅडम, कारगिरसर, मुंगडे, उदगिरे सर, सेवक राऊत, झरे यांच्यासह गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक पालक विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते