अभाविपच्या वतीने १४ ऑगस्ट रोजी मुखेडात अखंड भारत दिनानिमित्त मशाल रॅली 

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : प्रतिनिधी

              अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा मुखेड च्या वतीने 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता शहरातून अखंड भारत दिना निमित्त भव्य मशाल रॅली काढण्यात येणार आहे. 
भारताची 14 ऑगस्ट रोजी फाळणी करण्यात आली या फाळणीत अखंड भारताचे काही भाग विखुरले गेले त्यातून अनेक देशाचा जन्म झाला. संपुर्ण भारत पुन्हा अखंडीत करण्यासाठी 14 ऑगस्ट हा दिन अभाविपच्य वतीने संकल्प दिन म्हणून साजरा करण्यात येतो या दिनाचेे औचित्य साधून अभाविपच्या वतीने शहरातून भव्य मशाल रॅली काढण्यात येणार आहे.           
                  ही रॅॅली  तेलीपेठ हनुमान मंदीर ते बसस्थानक ते आंबेडकर पुतळा ते तगलाईन ते जुने पोलिस स्टेशन ते तेलीपेठ हनुमान मंदीर या मार्गावरून रॅॅली निघणार असून या रॅलीस शहरातील व तालुक्यातील नागरीक, विद्यार्थी , व्यापारी, वकील , डॉक्टर यांच्यासह सर्व नागरिकांनी  मोठया संख्येने उपस्थित रहावे असे अभाविपचे सचिन श्रीरामे, रामप्रसाद पेंढारकर, संदिप पोफळे , प्रमोद मदारीवाले, गणेश कास्टेवाड यांनी आवाहन  केले आहे.