सोमवारी १० कोटी रुपयांच्या विविध विकास कामाचा शुभारंभ! आमदार डॉ. राठोड यांची माहिती

Uncategorized नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड (प्रतिनिधी)
        आमदार डॉक्टर तुषार राठोड यांच्या प्रयत्नातून मतदार संघातील विविध विकास कामांचा शुभारंभ यांचा सध्या धडाका सुरू आहे. यात आज तब्बल १० कोटी २४ लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ माजी जि.प. अध्यक्ष श्रीराम पाटील राजूरकर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर हे राहणार आहेत.
या विविध विकास कामांचा शुभारंभ प्रसंगी विशेष अतिथी म्हणून माजी आ. किशनराव राठोड, माजी आ.अविनाशराव घाटे, व्यंकटराव पाटील गोजेगावकर, बळवंतराव पाटील बेटमोगरेकर, कृउबा सभापती खुशालराव पाटील उमरदरीकर, प.स.सभापती अशोक पाटील राजूरकर, बालाजी पाटील अंबुलगेकर, संभाजी पाटील लिंगापुरकर, व्यंकटराव पाटील चांडोळकर, शेषराव पाटील राजूरकर, गोपाळ पाटील इंगळे, श्रीमती गंगाबाई गोपाळराव पाटील राजूरकर, विलास पाटील राजूरकर, दीपक पाटील राजूरकर, बालाजी पाटील कबनूरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
       मुखेड कंधार मतदार संघात मागील अनेक वर्षांचा रस्त्यांचा अनुशेष आमदार डॉक्टर तुषार राठोड यांच्या माध्यमातून जवळपास पूर्ण झाला आहे यात मतदारसंघात मोठ्या स्वरूपात नागरिकांना पक्के रस्ते मिळाले असून यामुळे दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागला आहे आ. डॉ. तुषार राठोड यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या राजुरा (बु) – राजुरा (खु) – लिंगापुर अंदाजीत किंमत ३ कोटी रुपये व राजुरा (बु) -औराळ – लोणाळ – तडखेल अंदाजीत किंमत ७० लक्ष रुपये व सन्मुखवाडी – कबनूर – माकणी – अंबुलगा (झाडी) अंदाजीत किंमत २ कोटी ५४ लक्ष रुपये व देवला तांडा – बालाजीनगर – हिरामण नगर अंदाजीत किंमत ४० लक्ष रुपये, राजुरा खु – ठाणा अंदाजीत किंमत २ कोटी २० लक्ष रुपये, मानसिंग तांडा जमला तांडा बालाजीनगर तांडा पिंपळकुंठा तांडा अंदाजीत किंमत १ कोटी ४० लक्ष रुपये या जोड डांबरीकरण रस्त्याचे आज उद्घाटन होणार आहे या सर्व रस्त्यांची अंदाजीत किंमत १० कोटी २४ लक्ष रुपये आहे. अनेक या भागातील नागरिकांची पक्या रस्त्याची मागणी होती आता ही मागणी प्रत्यक्षात पूर्ण होत असल्याने या भागातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.