बेळकोणी येथे मन्नेरवारलू समाजाच्या वतिने जागतिक अदिवासी दिन साजरा*

नांदेड जिल्हा बिलोली

बिलोली / पवन जगडमवार

        बिलोली तालुक्यातील मौजे बेळकोणी बु) येथील अखिल महाराष्ट्र मन्नेरवारलू समाज संघटनेच्या वतीने 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरी करण्यात आले, बेळकोणी येथील अखिल महाराष्ट्र मन्नेरवारलू समाजाच्या पाटी जवळ जणनायक क्रांतिकारी बिरसा मुंडा, संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर कॉम्रेड अण्णा भाऊ साठे, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, यांच्या प्रतिमेला माजी आमदार गंगारामजी ठकरवाड साहेब यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले व जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आले

           यावेळी बेळकोणी येथिल उप सरपंच रामराव बेलापुरे, दिगंबर बुदेवार ,पोलिस पाटील लिंगुराम बुदेवार, माधव कमटमवाड,बळीराम इरलेवाड,गोविदं कमटमवाड, हणमंत गालेवार, बालाजी ठकरवाड, विठ्ठल कमटमवाड यांच्या सह समाज बांधव आणि गावातील प्रतिष्टीत नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते