वैजनाथ स्वामी यांच्या पुढाकारातुन कोल्हापुर,सांगली येथील पुरग्रस्तासाठी काढली मदत फेरी

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
नांदेड / प्रतिनिधी
           नांदेड येथिल युवा सामाजिक कार्यकर्ते  वैजनाथ स्वामी यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातुन शहरातील युवकांना अवाहन केले की पुरग्रस्त पिडीतासांठी आर्थिक मदत जमा करण्याकरीता एकत्रीत येऊन जमेल ती मदत जिल्हाअधिकारी यांचे मार्फत मुख्यमंत्री सहायता निधी करीता द्यावयाची आहे..या अवाहनास साद देत शहरातील सामाजीक कार्यकर्ते व युवा मित्र  व्हि.गोडबोले,अमरदिप गोधने,बळीराम पाटील,शिवराज उमाटे,गंगाप्रसाद स्वामी,भुरू मामा,गजानन इंगळे,अमोल स्वामी,शिवनंदन स्वामी,शिवराज स्वामी,मल्लिकार्जुन स्वामी,सोमनाथ स्वामी,चंद्रशेखर स्वामी,कृष्णा मठपती,उमाकांत गोदरे,मारोती पिटलेवाड,शेषेराव पिटलेवाड,बालाजी पत्तेवार,सदाशिव भटकडे इत्यादी मित्रांनी या मदतफेरी करीता उपस्थिती लावली, या मदतफेरीतुन मानुसकीचे दर्शन झाले.अनेकांनी जमेल तशी मदत केली.तसेच व्हाटस्अप फेसबुक वरिल मदतीची पोस्ट पाहुन अनेकांनी मुख्यमंत्री सहायता निधी करीता online आर्थिक मदत शासनाकडे जमा देखिल केली आहे.
                 4 ऑगष्ट पासुन मुसळधार पावसामुळे दोन्ही जिल्ह्याचे जनजीवन विष्कळीत झाले..अनेकांचे प्राण देखिल या अपत्तीमधे गेले आहे..राज्य व केंद्र शासनाने तातडीचे निर्णय घेऊन  भरघोसपने आर्थिक मदत करून पिडीत कुटुंबाना मदत करावी असे वैजनाथ स्वामी यांनी जिल्हाअधिकारी मा.अरूण डोंगरे  साहेब यांचेकडे विणंती केली. या आर्थिक मदत फेरीतुन जमा झालेली रक्कम धनादेशाव्दारे जिल्हाअधिकारी मा अरूण डोंगरे साहेब यांच्या कडे सुपुर्द करण्यात आला..मा.अरूण डोंगरे साहेब यांनी या कार्याचे कौतुक करत उभे राहुन धनादेश स्विकारला आहे..या मदतफेरीकरीता उपस्थित सर्व मित्रांचे व मदत करनार्या सर्वांचे आभार वैजनाथ स्वामी यांनी व्यक्त केले.