जाहूर – गोजेगाव बस टिकीट मशीन नसल्यामुळे तब्बल पाऊने दोन तास उशिरा

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
          मुखेड बस आगार मध्ये टिकीट मशिनचा तुटवडा

मुखेड / पवन जगडमवार

           दि 9 ऑगस्ट रोजी मुखेड येथिल बस आगारातून दुपारी 1 वाजून 30 मिनिटानी सुटणारी बस मुखेड हून जाहूर मार्गे आंबुलगा गोजेगाव जाणारी बस नियमित वेळेनुसार तब्बल पावणे दोन तास उशिरा मुखेड आगारातुन सुटल्याने विद्यार्थी आणि प्रवासी चांगलेच संतापले होते
त्यामुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी मिळून मुखेड बस आगारचे टि.आय मंरकडे यांनच्या कडे चौकशी केल्यावर टि. आय मंरकडे यांनी टिकीट मशिन नाही त्यामुळे उशिर होत आहे टिकीट मशिन आल्याबरोबर बस सोडली जाईल असे सांगून पाठविले मात्र दुपारी दीड वाजता सोडणारी बस तीन वाजून पंधरा मिनिटे तब्बल पावणे दोन तासा उशिरा नंतर बस सोडले  त्यामुळे विद्यार्थी व प्रवासी हे चांगलेच संतापले होते, 
          मुखेड बस आगार मध्ये टिकीट मशिनचा तुटवडा आहे त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावे लागत आहे तरी तात्काळ मुखेड बस आगार मध्ये टिकीट मशिन उपलब्ध करून द्यावे अशी अपेक्षा  विद्यार्थ्यांनी केली आहे चांडोळा तांडा, चांडोळा, बोरगाव, मंडलापुर, पाळा, तुपदाळ, जाहूर, भाटापूर, राजूरा, आंबुलगा, येथिल ग्रामीण भागातील विद्यार्थी व विद्यार्थीनी शाळा, कॉलेज, महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी मुखेड या तालुक्याच्या गावी सकाळी लवकर येतात त्यामुळे दुपारी भुक लागलेली असते त्यामुळे दुपारी कॉलेज सुटल्या बरोबर गावाकडे जाण्याची घाई सर्व विद्यार्थ्यांना असते परंतु मुखेड बस आगारमधुन जाहूर मार्गे गोजेगाव जाणारी बस नियमित वेळेनुसार सुटत नाही कधी वेळेवर च निघते तर कधी उशीराने निघते त्यामुळे विद्यार्थ्यांना व प्रवाशांना याचा सामना करावे लागत आहे असे विद्यार्थी विशाल जाधव यांनी सांगितले
               मुखेड बस आगार ला टिकीट मशिनचा तुटवडा आहे तर त्यात प्रवाशांना का त्रास देता टिकीट मशीन उपलब्ध नसले तर ट्रे टिकीट चा वापर करून बस सोडावे टिकीट मशीन नाही म्हणजे बस सोडायची च नाही असा हा काही पर्याय झाला का ? विद्यार्थी हे अगोदरच पैसे देऊन पास काढतात पन बस वेळेवर लागत नसल्याने पैसे देऊन सुध्दा बस ची वाट पाहत बसावे लागते त्यामुळे विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी उशीर होत आहे सर्व विद्यार्थ्यांनचे बस पास असल्याने त्या विद्यार्थ्यांना घरी जाण्याची बस शिवाय पर्याय नसतो आणि बस वेळेवर लागत नसल्याने विद्यार्थ्यांना तासनतास बस ची वाट पाहत बसावे लागत आहे तरी जाहूर मार्गे गोजेगावा जाणारी बस न  नियमित वेळेनुसार दिड वाजता न सोडता बरोबर दोन वाजता चे वेळ ठरवुन  वेळेवर सोडावे व त्यामुळे विद्यार्थ्यांना ही त्रास होणार नाही आणि प्रवाशांना पन त्रास होणार नाही सर्वांना याचा फायदा होईल असे विद्यार्थ्यांनी आमचे प्रतिनिधी पवन जगडमवार यांना सांगितले आहे त्यामुळे मुखेड चे बसआगार प्रमुख शिंदे साहेब या कडे लक्ष देऊन वेळेवर बस सोडावी अशी अपेक्षा विद्यार्थ्यांना कडून होत आहे यावेळी या बस ने प्रवास करणारे विद्यार्थी विशाल जाधव, नितिन ठक्के, शंकर येरगे,  परमेश्वर इबितदार, दयाशंकर रँपनवाड, यांच्या सह असंख्य विद्यार्थी यावेळी उपस्थित होते