देगलुर-मुखेड सह संपूर्ण दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना २०१८ – १९ चा खरीप व रब्बीचा पिक विमा भरपाई वाटप करा – कैलास यसगे कावळगावकर

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
बाऱ्हाळी: पवन कँदरकुंठे
           कैलास यसगे कावळगावकर यांनी मंत्रालयातील विषेश बैठकीत कृषी मंत्र्यालयाकडे नुकतीच केली मागणी.
सन २०१८/१९ मध्ये नांदेड सह संपुर्ण मराठवाड्यात कोरडा दुष्काळ होता. देगलुर-मुखेड सह अनेक तालुके ‘गंभीर दुष्काळी’ म्हणून जाहीर ही झाले.तरी सुद्धा प्रधानमन्त्री पिक विमा योजनेतील जाचक अटीमुळे दुष्काळ ग्रस्त शेतकरी आपल्या हक्काच्या पिक विम्या पासुन वंचित राहीला आहे.आम्ही सर्व शेतकरी मागील तिन महिन्यांपासून मोर्चे,आंदोलणाच्या माध्यमातून या विषया चा वेळोवेळी पाठपुरावा सुद्धा केला.तरी सुद्धा शासनाने या विषयावर गांभीर्याने लक्ष दिले नाही.
            तरी या विषयाची गंभीरता लक्षात घेऊन पिक विमा योजनेतील जाचक अटी रद्द करून दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी  कैलास येसगे कावळगावकर यांनी दि.०७ रोजी ( क्रषी मंत्री,महाराष्ट्र राज्य, मुंबई-३२ ) मा.डाँ.अनिल बोंडे साहेबांना सदरील निवेदनात केली आहे.