कृषी सहायक आल्लडवाड यांनी घेतली निवळी येथे शेतकऱ्यांंची शेतीशाळा

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड : पवन जगडमवार
         मुखेड तालुक्यातील बाऱ्हाळी परिसरातील निवळी येथे खरीप हंगाम 2019-20 वतिने दिनांक 6 ऑगस्ट 2019 रोजी मौजे निवळी येथे कृषी सहायक आल्लडवाड यांनी शेतकऱ्यांंची शेतीशाळा घेतली . 
            या शेतीशाळेमध्ये पिकाची निरीक्षणे घेवुन फवारणीसाठी औषधाची शिफारस करण्यात येते
कापुस पिकावर मोठ्या प्रमाणात मावा,तुडतुडे,पांढरी माशी, फुलकीडे इत्यादी रस शोषण करणाय्रा कीडी आढळतात त्यासाठी पिवळ्या चिकट सापळ्याचा वापर तसेच निबोंळी अर्काचा वापर,जैविक औषधाचा वापर कमी खर्चाच्या पण परिणामकारक गोष्टिचा वापर केला जातो पिकाच्या लागवडीपासुन ते काढणीपर्यंत सर्व माहिती शेतीशाळेच्या माध्यमातुन शेतकऱ्यांंना  वेगवेगळ्या सत्रात देण्यात आले व शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांची पाहणी करण्यात आली
या शेतीशाळेस निवळी येथील शेतकऱ्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला. 
            ही शेतीशाळा मुखेड येथील कृषी कार्यालयाचे कृषी सहायक एस एस आल्लडवाड व एन एल मदेवाड यानी घेतली होते या शेती शाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य माहिती व कमी खर्चात उत्पन्न कसे करावे व कोणकोणते औषध खत वापरावे याबाबत माहिती देण्यात आली  शेतीशाळेसाठी पत्रकार पवन जगडमवार शेतकरी संभाजी पाटील माळेगावे  ,विश्वनाथअप्पा मठपती , यांच्या सह निवळी येथिल असंख्य शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते