तलाठी व ग्रामसेवकांना सज्जावर ऊपस्थीत राहण्याचे आदेश द्या – शेकाप

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
बाऱ्हाळी : पवन कँदरकुंठे
              मुखेड तालुक्यातील सर्व तलाठी व ग्रामसेवक त्यांच्या सज्जावर राहत नसल्याने मुखेड तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना नाहक असा त्रास सहन करावा लागत आहे.तलाठी व ग्रामसेवक यांना कोणत्याही शासकीय कामास्तव फोन केल्यास ते फोन सुद्धा ऊचलत नाहीत.व तसेच एक एक महीना ते गावावर येत नाहीत,त्यांना शोधण्यासाठी मुखेडला यावे लागते, त्यामुळे शेतकऱ्यांना व नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा पैसा व वेळ खर्च होत असून तलाठी व ग्रामसेवकांना सज्जावर ऊपस्थीत राहण्याचे आदेश द्या असे निवेदन दि. ०५ रोजी  तहसीलदार काशीनाथ पाटील यांना शेकापच्या वतीने देण्यात आले. 
             शेतकरी हा शेती पिकत नसल्यामुळे तो आर्थिक दृष्ट्या कमकुवत झालेला आहे.तलाठी व ग्रामसेवक त्यांच्या त्यांच्या सज्जाच्या ठिकाणी असल्यास शासनाचा योजनेचा फायदा शेतकरी घेऊ शकतील व त्यांना होणारा त्रास कमी होईल.यावेळी,निवेदन देताना अँड.गोविंद डुमणे शेकाप जिल्हा चिटणीस ,आसद बलखी शहर अध्यक्ष,भाई पांडुरंग लंगेवाड ता सलागर ,शेख बबलू युवा ता अध्यक्ष सह असंख्य शेकापचे कारेकर्ते हजर होते…