मुखेडमध्ये कलम 370 च्या निर्णयाचा विश्व हिंदु परिषद व बजरंग दलच्या वतीने रॅलीकाढुन जल्लोष

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड
            जम्मु कश्मीर च्या कलम 370 बाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत प्रस्ताव ठेवुन जम्मु – कश्मीर व लद्दाख ही दोन केंद्रशासीत प्रदेश म्हणुन अस्तित्वात येणार असल्याने मुखेडमध्ये विश्व हिंदु परिषद व बजरंग दलच्या वतीने रॅलीकाढुन जल्लोष करण्यात आला. 
              यानिमित्त मुखेडचे ग्रामदैवत विरभद्र स्वामी येथे आरती करुन ढोल ताशांच्या गजरात मुख्य रस्त्यावरुन रॅली काढण्यत आली. स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर पहिल्यांदाचा पहिला धाडसी निर्णय घेण्यात आला. यामुळे मुखेमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होऊन कार्यकर्त्यांनी  फटाके, ढोल वाजुन शासनाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. 
            यावेळी आ.डॉ. तुषार राठोड, भाजपा जिल्हा सरचिटणिस माधव अण्णा साठे, कृउबा सभावती खुशालराव  पाटील उमरदरीकर, अनिल शेठ जाजु, अपक्ष नगरसेवक प्रा. विनोद आडेपवार, गोविंद घोगरे,  विश्व  हिंदु परिषदचे तालुकाध्यक्ष महेश मुक्कावार, शहरमंत्री संजय वाघमारे, बजरंग दल तालुका संयोजक शंकर नाईनवाड, सुरेश उत्तरवार, रमेश भागवतकर, ज्ञानेश्वर डोईजड, बालाजी महेरकर,  विनोद रोडगे, अल्पसंख्याक मा जिल्हाध्यक्ष नाजीम पाशा सौदागर, देविदास सुडके, प्रमोद मदारीवाले, संदिप पोफळे, सचिन परकंठे, राम सावळेश्वर, बळीराम बोमनवाड, किशोरसिंह चौहाण, दशरथ रोडगे, कैलास पोतदार, नितिन टोकलवाड, योगेश पाळेकर, गणेश कास्टेवाड, शंकर चिंतमवाड, साई बोईनवाड, राजु गजलवाड,  वैभव जक्केवाड, जीवण कवटीकवार, योगेश नारलावार, भगवान गुंडावार, बालाजी तलवारे, रमांकांत गोकुळे, गोविंद चौधरी , राजु रणभिडकर, शिवाजी राठोड, सुधीर चव्हाण यांच्यासह  विश्व  हिंदु परिषद , बजरंग दल  कार्यकर्ते उपस्थित होते.


     भाजपाच्या वतीने जाहुर येथे फटाके
                तालुक्यातील जाहुर येथे जम्मु कश्मीर च्या कलम 370 बाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहायांनी राज्यसभेत प्रस्ताव ठेवुन जम्मु – कश्मीर व लद्दाख ही दोन केंद्रशासीत प्रदेश म्हणुन अस्तित्वात येणार असल्याने भाजपा तालुकाध्यक्ष नामदेव पाटील जाहुरककर यांच्या नेतृत्वात फटाकं फोडुन आनेदोत्सव साजरा करण्यात आला. 
            यावेळी रमाकांत पाटील, विठठलराव पाटील, रामदास हिवराळे , अर्जुन सुरनर, शिवाजी मदने, प्रकाश हिवराळे, शंकर दामेकर, पदमाकर बोडके, विक्रम वर्षेवाड, राहुल बोडके आदी उपस्थित होते.