साठे जन्मशताब्दी भित्तीपत्रक विशेषांक कौतुकास्पद – माजी आमदार अविनाशरावजी घाटे

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : पवन जगडमवार

मुखेड येथिल शाहीर अण्णाभाऊ साठे महाविद्यालयात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी काढलेला “शब्दवेध” भित्तीपत्रकाचा विशेषांक कौतुकास्पद आहे, असे गौरवपूर्ण उदगार फुले समाज सुधारक समितीचे संस्थाध्यक्ष मा.अविनाशरावजी घाटे यांनी काढले.

मुखेड येथील शाहीर अण्णा भाऊ साठे महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने यावर्षी पासून सुरु होणाऱ्या साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी निमित्ताने भित्तीपत्रकाचा विशेषांक काढण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुखेडनगरीचे विद्यमान आमदार डॉ. तुषार राठोड, जेष्ठ काँग्रेस नेते मा.शेषेराव चव्हाण, प्राचार्य डॉ. मनोहर तोटरे,गणपत गायकवाड,लसाकमचे गायकवाड यांची विशेष उपस्थिती होती. याप्रसंगी आ.डॉ. तुषार राठोड व मा.शेषेराव चव्हाण यांनी विद्यार्थ्यांचे तोंडभरून कौतुक केले आणि भविष्यात यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. राम धारासूरकर, प्रा.डॉ. केशव पाटील, प्रा.बसवेश्वर स्वामी, प्रा.संजीव डोईबळे, प्रा.सुदाम फड,प्रा.नारायण शिंदे, प्रा.एम.टी.मंदेवाड, प्रा.शिवाजी पाडदे ,प्रा डॉ फुल्लागोळ , पत्रकार पवन जगडमवार प्राध्यापक व कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.