मुखेड येथील होनवडज गावची कन्या, गरीब परीस्थितीवर मात देऊन फडकवला भारताचा झेंडा
मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड
शेतकरी कुंटूबात जन्म घेऊन आपल्या गावचेच नाव नव्हे तर देशाचे नाव जगाच्या नकाशावर कोरण्याचे काम मुखेड तालुक्यातील होनवडज गावची कन्या भाग्यश्री माधवराव जाधव हिने चिन येथे झालेल्या जागतिक पॅरा अॅथलेटिक्स क्रिडा स्पर्धेत दोन कास्य पदक पटकावुन भारताचे नाव व भारताचा झेंडा अभिमानाने फडकावला.यायाबबत संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष बालाजी पाटील सांगवीकर यांनी सदर बाब हिंगोली येथे मुख्याधिकारी पदी असलेले सध्या मुखेड- कंधार मतदार संघात भाजपकडून इच्छुक असलेले रामदास पाटील यांना सांगितल्यानंतर लगेच भाग्यश्रीच्या यशाची माहीती घेतली नांदेड येथे त्यांची भेट घेवून तिचे या यशाबद्द कौतुक करून पालकत्व स्वीकारले.
रामदास पाटील स्वतः दिव्यांग असून ,त्यांना दिव्यांग्यापुढे येणार्या समस्याची जाणीव आहे. जो माणुस अशा व्यथा सोसतो त्याला याची जाण असते.भाग्यश्री दिव्यांग आहे म्हणुन पाटील यांनी भाग्यश्रीला तु घाबरुनकोस मी तुझ्या सोबत आहे असी ग्वाही दिली.यापुढे प्रशासकीय ,आर्थिक सर्व मदत करून पालकत्व घेवून तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
रामदास पाटील यांनी कोणत्याही लोभाची भावना न ठेवता तळागाळातील ,सर्वसामान्य मानसाला न्याय गरजु ,गुणवंताना यशाच्या शिखरापर्यन्त पोहचविण्यासाठी धडपडता ,आतापर्यंन्त आपन तुम्हाला जसे जमेल तसे समाजकार्य करतच आलात असेच समाज कार्य आपल्या हातुन सदैव घडो हिच सदिच्छा असल्याचे बालाजी पाटील सांगवीकर,प्रकाशजी कांबळे,भाग्यश्रीची आई,व बंधु यांनी दिल्या.